औषध expire होतं म्हणजे नक्की काय होतं हेच लोकाना माहित नसतं. औषध expire झालं म्हणजे त्यात विष तयार झालं यासारखे असे अनेक समज आहेत लोकांचे. तर औषध expire होतं म्हणजे त्याच्या लेबल वर त्याची जी स्ट्रेंग्थ लिहिलेली असते, (उदा. क्रोसिन वर लिहिलेले असते each tablet contains paracetamol 500 mg, तर 500 mg ही झाली या औषधाची strength).

ती ज्या दिवशी १०% ने कमी होते ती झाली त्या औषधाची expiry date! मुळात expiry date साठी वापरला जाणारे जे शास्त्रीय नाव आहे ते आहे t-90.

यातला t म्हणजे Time…वेळ.

औषध जेव्हा 90% उरते (म्हणजेच १०% ने कमी होते)
तो वेळ म्हणजेच expiry date.
आता यावरूनच लक्षात येईल की बहुतेक वेळेला expiry date उजाडते तेव्हा त्यावर दिलेल्या dose पेक्षा औषधाची मात्रा कमी झालेली असते. त्यामुळे त्याचा परिणाम थोडा फार कमी होतो, तो शून्य होतो असे अजिबात नव्हे. वर दिलेल्या उदाहरणात १०% म्हणजे 500 पैकी 50 mg paracetamol कमी झाले तरी ४५० mg शिल्लक असतेच, आणि त्याचा परिणाम दिसून येतोच, पण तरीही expiry date नंतर औषधे शक्यतो घेऊ नयेत. त्याचे कारण असे वरच्या उदाहरणात मी लिहिलंय की
औषधाची strength १०% कमी होते.

*पण म्हणजे नक्की काय होतं?* 

तर औषध हे शेवटी एक chemical आहे आणि काळानुसार ते हळू हळू chemical reactions मुळे degrade होते. हवेतील oxygen मुळे oxidation होऊन किंवा हायड्रोजनमुळे reduction होऊन किंवा सूर्यप्रकाशामुळे किंवा इतर असंख्य chemical reactions मुळे हे औषध degrade होते.
जसजसा वेळ जाईल तसतसे ते degrade होऊन त्याचे इतर पदार्थात रुपांतर होते. एका औषधाचे वेगवेगळ्या मार्गाने degradation होऊ शकते आणि त्यामुळे एकाच वेळी त्याची वेगवेगळी reaction products बनू शकतात ही reaction products निरुपद्रवी असतील तर त्याचा परिणाम इतकाच होतो कि औषधाची strength कमी
होते. पण कधी कधी मात्र ही reaction products अपायकारक असूही शकतात. अर्थात प्रत्येक औषधाचा अश्या प्रकारचा forced degradation study औषध कंपनीत केलेला असतोच आणि expiry date पर्यंत त्यात काहीही अपायकारक reaction product बनत नाही ना, हे तिथे पहिलेच जाते, पण expiry date नंतरचा असा अभ्यास मात्र कंपनीने केलेला नसतो. समजा औषधावर लिहिलेली expiry date २ वर्षे आहे. तर मग जो अभ्यास केला जातो तो या दोन वर्षांचाच असतो. पण समजा हे औषध दोन तीन वेगवेगळ्या degradation pathways ने degrade होते आहे, ज्यातला एक pathway अत्यंत संथ आहे, त्याचे reaction product ४ वर्षानंतर बनतेय आणि ते अपायकारक आहे. आणि असे औषध जर कुणी expiry date नंतर घेतले तर अपाय होऊ शकतो. भारतासारख्या देशात जिथे अशिक्षित रुग्णांचे प्रमाण प्रचंड आहे तिथे ही गोष्ट लोकांना समजावून सांगणे कठीण आहे. शिवाय कुठले औषध expiry नंतर घेतले तर चालेल आणि कुठले नाही हे सांगणे ही कठीण आहे.
कारण हजारो औषधे बाजारात आहेत.

*आणि म्हणूनच expiry date नंतर औषधे न घेणेच उत्तम!*

* काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

चित्ता हा जरी वेगवान प्राणी असला तरी तो जास्त दूर पळू शकत नाही.

त्याचा पळण्याचा वेग 100 ते 120 किमी प्रती तास असला तरी तो कमीत कमी 600 मी ते 1 किमी पर्यंत धावू शकतो.

कारण त्याचा मेंदू 40.5 अंश से तापमाना पलिकडे गेला तर तो दगाऊ शकतो.

कारण पळाल्यामुळे त्याचे रक्त गरम होते व थेट मेंदुत पोहोचते आणि तापमान थंड करण्यासाठी त्याला घाम येत नाही. जो येतो तो पंजातून येतो

पण घोड्याचा वेग 88 किमी प्राति तास आहे.

पण तो 70 ते 100 किमी पर्यंत धावू शकतो अणि त्याला घाम येत असल्यामूळे तो त्याचे तापमान नियंत्रीत करतो.

यामुळे घोडा हा वेगाचे प्रतिक आहे.*

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

साप हा सरपटणारा प्राणी आहे.

त्याची त्वचा सरपटन्यामुळे बोथट झालेली असते. त्यामुळे त्याचा वेग कमी होतो.

अशावेळी साप एखाद्या फटीतून ती त्याच्या शरीरापेक्षा लहान आहे अशा फटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच त्याच्या शरीरावर तयार झालेली बोथट त्वचा स्वतःपासून वेगळी करतो.
त्यामुळे त्याची जुनी त्वचा गळून पडते. आणि त्याला नवीन त्वचा मिळते.

याला कात टाकणे असे म्हणतात. कात टाकल्या बरोबर तो सळसळ करत नाही. तर थोडा वेळ मलूल झालेला असतो कारण जुनी त्वचा टाकताना त्याला बराच त्रास झालेला असतो.

नंतर मात्र तो वेगाने सरपटू लागतो.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

अंतराळात गुरुत्वाकर्षण शक्ती नसते, त्यामुळे तेथे सर्व
गोष्टी तरंगतात, असे म्हटले जाते.

पण हे पूर्ण सत्य नाही. 

अंतराळात प्रत्येक ग्रहाला स्वत:ची गुरुत्वाकर्षण शक्ती असते. त्यामुळेच चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, अन्यथा तो पृथ्वीच्या कक्षेबाहेर भरकटला असता.

नासा या अमेरिकेच्या अंतराळ संस्थेच्या मते, बहुतांश लोकांमध्ये हा समज असतो की,
अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते. 

पण अंतराळात प्रत्येक ठिकाणी ही शक्ती असते. अर्थात जी जागा रिक्त असते, त्या ठिकाणी सूक्ष्म गुरुत्वाकर्षण असते. त्याला मायक्रो ग्रॅव्हिटी असे म्हणतात.

अंतराळातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला स्वत:कडे आकर्षित करते.

या दोन वस्तूंमध्ये किती द्रव्य आहे आणि त्या किती अंतरावर आहेत, यावर हे आकर्षण अवलंबून असते.

ब्रह्मांडात वस्तू किंवा ग्रहांमधील अंतर वाढल्यास गुरुत्वाकर्षण कमी होत जाते.

गुरुत्वाकर्षणच ग्रहांची कक्षा, सौर मंडळ, आकाशगंगांना आकार देते.

पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण, चंद्र आणि मानवनिर्मित उपग्रहांना कक्षेतच ठेवते.

अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण अंतराळ प्रवाशांना तितके जाणवत नाही. क्षीण गुरुत्वाकर्षणामुळे व्यक्ती, वस्तू हलक्या जाणवतात. त्यामुळे तेथे तरंगत असल्याचा भास होतो.

वेगाने चालणाऱ्या लिफ्टमध्ये किंवा रोलर कोस्टरमधून डोंगरावरून खाली येताना आपल्याला हलके झाल्याचे जाणवते.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

तर ह्याचे उत्तर आहे

रेल्वेला टिपिकल गाड्यांसारखे शिफ्टिंग गियर असणारे गियर बॉक्स नसतात.
रेल्वेला बेसिक दोन प्रकारचे गियर्स असतात.

हे गियर्स रेल्वेच्या चाकांच्या एक्सलला जोडलेले असतात.

हे दोन प्रकारचे गियर्स म्हणजे मेन गियर
आणि पिनियन गियर होय.

हे पिनियन गियर ट्रॅक्शन मोटरला जोडलेले असतात तर मेन गियर हे मुख्य चाकाला जोडलेले असतात.

इलेक्ट्रिक मोटर्सना गियरची आवश्यकता नसते कारण त्यांचा टॉर्क शक्तिशाली असतो किंवा कधी कधी इलेक्ट्रिक लोकोमोटरला एक सिंगल गियर दिलेला असतो. डिझेल वॅगन्सनाही गियर्स असतात.

काही डिझेल वॅगन्स मध्ये टॉर्क कन्व्हर्टर सह तीन ते चार गियर बॉक्स दिले असतात.

काही वॅगन्सना ट्रक सारखे मॅन्युअल क्लच आणि गियर बॉक्स दिलेले असतात. ट्रेन कंडक्टरजवळ क्लच पेडल व गियर लिव्हर असतात.

मालगाडीच्या इंजिनाला १:४:५ ह्या रेशीयोने गियर दिले असतात तर पॅसेंजर ट्रेनला इंजिनाला १:२:५ हा रेशीयो असतो.

परंतु रेल्वे इंजिनाला कार किंवा ट्रक सारखे ट्रान्समिशन गियर्स नसतात.

आताचे इंजिन हे डिझेल किंवा वीजेवर चालतात. डिझेल इंजिनामध्ये अल्टरनेटर दिलेले असतात

ज्यामुळे ट्रॅक्शन मोटर चालते.

अगदी बेसिक लोकोमोटिव्ह मध्ये सहा ट्रॅक्शन मोटर्स व एक अल्टरनेटर दिलेले असते.

लोको पायलट त्याच्या केबिन मध्ये असलेल्या लिव्हरने ट्रॅक्शन मोटर मधून पास होणारा करंट कमी जास्त करू शकतो. ह्याने रेल्वेचा वेग कमी जास्त होतो. करंट कमी जास्त करण्यासाठी अल्टरनेटरला फिल्ड कॉईल्स जोडलेल्या असतात.

छोट्या स्वयंचलीत वॅगन्स लहान मार्गांवर पॅसेंजर सुविधा देतात. ह्या वॅगन्सना लोकोमोटिव्ह म्हणजेच इंजिनची गरज नसते कारण ह्या वॅगन मध्येच डिझेल किंवा इलेक्ट्रिक इंजिन असते.

ह्या वॅगन्स मोठ्या ट्राम प्रमाणेच दिसतात व ह्यांना अश्याच आणखी तीन ते चार वॅगन्स जोडलेल्या असतात आणि त्याही रुळांवरच धावतात.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

पानाला आपण चुना व कात लावत असतो. चुना हा अल्कली आहे. आणि कातामध्ये टॅनिक हा प्रमुख घटक असतो. कातातील टॅनिक व चुन्यातील अल्कली यांच्यात क्रिया होते. पानातली रस आणि तोंडातील लाळ यामुळे सुरवातीला काहीसे तपकिरी रंगाचे द्रव तयार होते. थोड्या वेळाने त्याचा रंग तांबडा होतो. परिणामी, आपले तोंड पान खाल्ल्याने रंगून जाते. *काय मग? कसं वाटलं हे गुपित?*
गूगल…आजच्या काळातला गुरु. जे हवं ते सारं तिथं जाऊन सांगायचं..विचारायचं.. गणिताच्या सूत्रापासून ते ज्योतिष विद्येपर्यंत.. सौंदर्य प्रसाधनांपासून सौंदर्य उपासनेपर्यंत सारं काही मिळतं. एकही गोष्ट अशी नाही जी गूगलवर सापडत नाही. एकाच वेळी एकाच गोष्टीचे शंभर पर्याय दिसतात. तुम्ही बटन दाबायचा अवकाश…………..‌अलिबाबाची गुहाच समोर! एक विचारा दहा पर्याय उपलब्ध. घरात बसून जग मुठीत आणून देतं हे गूगल.‌ पुस्तकं, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, परफ्यूम मागाल ते उपलब्ध. जे गावात मिळत नाही ते एका क्लिकवर घरपोच होतं. यातूनच आॅनलाईन खरेदी विक्रीचे नविन मार्केट सुरु झाले. फेसबुक! याबद्दल वेगळं काय सांगावं? करोडो चेहरे ओळखीचे…अनोळखीसे या फेसबुकने दाखवले आहेत. जग जवळ आणायचं काम याच फेसबुकने केलं आहे. कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हा मोठा प्लॅटफाॅर्म ठरला आहे. तसंच खरेदी विक्रीचे व्यवहार सुध्दा सर्रास इथं होतात. लाखो बिझनेस ग्रूप आहेत. या ग्रूपमध्ये होलसेल, रिटेल खरेदी विक्री होते. नव्या नव्या बिझनेसच्या कल्पना लढवून तो वाढवता येतो. त्या माध्यमातून अनेक खरेदीदार व विक्रेते एकमेकांना भेटतात. पण एक गोष्ट लक्षात आली आहे का तुमच्या? गूगलवर आपण खुल जा सिम सिम.. तिळा तिळा दार उघड म्हणत गुहेत प्रवेश करतो… काही खरेदीसाठी वस्तू शोधतो. तो शोध घेताना दिसणारी हजारो डिझाईन्स, हजारो नमुने, हे सारं पाहताना भूलभुलैया मधअडकल्यासारखं होतं. खरोखर अलिबाबाच्या गुहेत अडकलेला कासिम जसा काय घेऊ यातलं असा प्रश्न पडून गोंधळून गेला होता तीच अवस्था आपली होते. ज्या वस्तू आपण शोधल्या, पाहील्या नेमक्या तसल्याच विविध कंपन्यांच्या वस्तू आपल्याला फेसबुकवर पण दिसू लागतात. आंयऽऽ या सरदाराला कसं समजलं आपण गुहेची सफर केली ते? लगेच शो केस समोर आली…आपण चाटमचाट पडतो. केला आहे का कधी हा विचार..हे कसं होतं? तुम्ही प्रवासाला जायचं ठरवता. त्या अनुषंगाने ठिकाणं विमान तिकीटाचे दर, तिथं असलेली हाॅटेल्स, त्यांचे दर हे सारं तपासत असता. हे सारं करत असताना आपला ब्राऊझर तो डाटा जाहीरातदारांना पाठवत असतो. म्हणजेच जाहिरातदार कंपन्या, फेसबुक हे एकमेकांना संलग्न आहेत. गूगल, फेसबुक आणि या कंपन्या एकमेकांना एका अल्गोरिदमनं जोडलेल्या असतात. त्यामुळे आपला आयपी अॅड्रेस या कंपन्यांना समजतो. आपला आयपी अॅड्रेस internet protocol address हा आपल्या घराच्या पत्त्यासारखा असतो. हा त्या जाहिरातदार कंपन्यांना दिला जातो. त्यामुळे तिथे आपला संभाव्य ग्राहक म्हणून हा अॅड्रेस कळतो. आणि पत्रं, कुरीयर जसे आपल्या पत्त्यावर सहजासहजी येऊन पोहोचतात त्याचप्रमाणे या कंपन्या विविध वस्तूंच्या जाहिराती, वेगवेगळ्या वेबसाईट यांचा डाटा फेसबुकवर आपल्या वाॅलवर आणून ओततात. पण व्यापार जगतात एक अलिखित नियम आहे, तुम्हाला व्यापार करायचा असेल तर तुमचा ग्राहक, त्याच्या आवडीनिवडी माहीत असायला हवी. रोजच्या जीवनात आपला नेहमीचा दुकानदार आपल्या ओळखीचा असतो. त्याला आपली आवड नावड माहीत असते. तो त्यानुसारच वस्तू दाखवतो. आॅनलाईन मार्केटमध्ये ही माहिती कशी मिळवायची? ती असली तरच तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टी देऊ शकतात.मग तरीही या जाहिराती आपल्यापर्यंत येतात कशा? थोडासा विचार करा मग लक्षात येईल, तुम्ही फेसबुक जाॅईन केलं तेंव्हा तुमचा डाटा भरला होता.. तुमचं नांव, गांव,लिंग, आवडते सिनेमा, तुमचे राजकिय मत, तुमच्या आवडी…या नोंदी अगदी बिनचूक असतात. हाच बिनचूक डाटा कंपन्यांना दिला जातो आणि तोच लक्षात घेऊन या जाहिराती बनवल्या जातात आणि त्या त्या माणसांच्या आवडीनिवडी, इंटरेस्ट, यांचं वर्गीकरण करुन त्यानुसार पाठवल्या जातात. थोडक्यात या आॅनलाईन जाहिराती आपल्याकडे ब्राऊझर किंवा सोशल मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून येतात. हे करत असताना संभाव्य ग्राहक म्हणून तुमचा डाटा म्हणजे तुमच्या आवडी निवडी, तुमचे इंटरेस्ट हे सारं विचारात घेतलं जातं. कारण हे तुम्ही फेसबुक जाॅईन करत असताना तिथं माहिती भरताना दिलेलं असतं. Social Media Examiner म्हणजे फेसबुक तुमची हेरगिरी करतं का? याचं उत्तर काही अंशी हो असंच आहे. तुम्ही वेबसाईटना दिलेल्या भेटी, तिथं घालवलेला वेळ हा डाटा, तुम्ही पोस्ट करता त्या पोस्ट, फोटो यातून तुमचा कल समजत असतो. उदा. तुम्ही तुमच्या मित्रांसह काढलेले फोटो पोस्ट करता. त्यात तुम्ही जर विविध ठिकाणी वेगवेगळ्या वेषभूषा करुन पोस्ट टाकल्या असतील तर तुम्हाला कपड्यांची आवड आहे हे समजतं आणि मग त्या प्रकारच्या जाहिरातदारांना हा तुमचा ग्राहक होऊ शकतो बरं का. अशी टिप मिळाली की ते लगेच आपला लवाजमा घेऊन तऱ्हेतऱ्हेच्या आॅफर…नवी डिझाईन… डिस्काउंट.. नव्या स्कीम्स… यांसह आपल्या वाॅलवर प्रकट होतात. तसंच ब्राऊझरमध्ये तुम्ही कोणत्या वेबसाईटवर गेला, तिथं किती वेळ काय काय शोधलं यांचा डाटा ही या जाहिरातदार कंपन्यांना मिळतो. तो छोट्या टेक्स्ट फाईलच्या रुपात असतो. त्याला कुकीज असं म्हणतात. त्यामुळं तुम्हाला काय आवडतं… काय द्यायचं हे त्यांना बरोबर समजतं. तुम्ही कोणत्या साईटवरुन काही खरेदी केली तर नंतर त्यांची नवी प्राॅडक्ट्स, नव्या आॅफर हे सारं पुन्हा पुन्हा तुमच्या वाॅलवर आणून दिलं जातं.अगदी तुम्ही शाॅपिंग कार्टमध्ये जरी टाकलं तरीही! कारण त्यामुळे तुम्ही संभाव्य ग्राहक म्हणून त्यांच्या यादीत असता. आणि ग्राहक हा देव आहे! मग जाहिरातींचा ओघ सुरु होतो. जाड असाल तर बारीक व्हा…बारीक असाल तर जाड व्हा.. त्यासाठी हे खा..ते वापरा असं सांगत कामात अडथळे आणणारी चित्रं आठवली का? उपाय* *या जाहिराती अती त्रासदायक ठरत आहेत असं वाटलं तर आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो हा भागही आहे यात. सेटींग्ज मध्ये जाऊन तुम्ही जाहिराती नको असं सांगू शकता आणि हा अडथळा थांबवू शकता.* *काय मग? कसं वाटलं हे गुपित?*
गरिबी हे केवळ आपल्याच नाही तर जगातील कित्येक देशांना लागलेलं ग्रहण आहे. जगात असे अनेक देश आहेत ज्यांची परिस्थिती पाहता लक्षात येते की भारतात आपण कैक पटीने सुखी आहोत. ‘देश गरीब’ म्हणजे त्या देशाकडे पैसे (सरकारी खजिन्यात!) नसणे किंबहुना तेथील नागरिकांकडे पैसे नसणे. अनेकांच्या मनात सहज विचार येतो, की प्रत्येक देशाचं एक वेगळं चलन असतं आणि त्या चलनाची छपाई त्या देशातच होत असते. म्हणजेच स्वत: पैसे छापून देखील तो देश किंवा तेथे राहणारी जनता गरीब का? प्रत्येक देशाकडे पैसे छापणारी मशीन असताना देश हवे तेवढे पैसे छापून लोकांमध्ये का नाही वाटत? म्हणजे आपसूकच देश श्रीमंत होईल नाही का? असे प्रश्न आपल्या मनात येतात आणि ते येणं साहजिकच आहे म्हणा, पण या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे – *‘मुळीच नाही…हवे तेवढे पैसे छापून कोणताही देश श्रीमंत होऊ शकत नाही…”* हे खरं आहे की मंदीच्या काळात देश अधिक नोटांची छपाई करतात. पण ते देखील तेव्हाच केले जाते जेव्हा अतिशय गंभीर स्थिती उद्भवते. परंतु असे करणे देखील देशाच्या आर्थिक स्थितीसाठी धोकादायक ठरते कारण प्रमाणापेक्षा जास्त चलन छापल्यास देशात तीव्र क्षमतेची महागाई निर्माण होऊ शकते. अश्या परिस्थितीचे सर्वात उत्तम उदाहरण पहायचे झाल्यास आपण ‘झिम्बाब्वे’कडे पाहू शकता. जेव्हा एखादा देश हवे तेवढे पैसे छापतो तेव्हा त्याचा ‘झिम्बाब्वे’ होतो…! आता प्रश्न हा आहे की केवळ अमर्याद नो छापल्याने ही महागाई कशी निर्माण होईल? *जर सरकारने हवे तेवढे पैसे छापले आणि जनतेमध्ये वाटले तर त्याचा नेमका काय परिणाम होईल?* जेव्हा तुमचं उत्पन्न वाढतं, तेव्हा तुमचा खर्च वाढतो आणि ‘स्टेटस’ नुसार गरजा देखील वाढतात. आता असा विचार करा की तुम्ही टीव्हीवर बातम्या बघत बसला आहात आणि अचानक एक ब्रेकिंग न्यूज येते की सरकारने प्रत्येक नागरिकाला १ करोड रुपये वाटण्याचा निर्णय घेतला आहे – जेणे करून सर्वजण आरामात खाऊन पिऊन सुखी राहू शकतील. दुसऱ्याच क्षणी तुम्हाला मेसेज येतो की तुमच्या खात्यामध्ये सरकारकडून १ करोड रुपये क्रेडीट केले गेले आहेत. बस्स! मग काय आनंदी आनंद गडे…जिकडे तिकडे चोहीकडे… तुम्ही झटक्यात करोडपती झाला आहात. आता तुमच्या मनात विचार येईल ‘आता तर मी श्रीमंत झालो आहे, हवी ती वस्तू मी खरेदी करू शकतो’…आणि तुम्ही सरळ शॉपिंग करण्यासाठी धावत सुटाल. नेमका हाच विचार प्रत्येक माणूस करेल. अचानक वस्तूंची मागणी वाढेल, कारण आता प्रत्येकाकडे पैसे आल्याने प्रत्येक जण खर्च करण्यासाठी उतावीळ आहेत. पण याचवेळी, आपल्या चलनाचे मूल्य झटक्यात कोसळेल. चलनाचे मूल्य काय असते? ते का बरं कोसळेल? *अजून सोप्प करून सांगतो* समजा तुम्हाला घर घ्यायचं आहे. पूर्वी त्या घराची किंमत होती ३० लाख रुपये. परंतु तेव्हा तुमच्याकडे पैसे नव्हते. पण आता सरकारकडून १ कोटी रुपये मिळाल्याने तुम्ही थेट त्या बिल्डरकडे धाव घेतली आणि पाहता तर काय तुमच्यासारखे हजारो जण त्या घराबाहेर उभे आहेत…! प्रत्येक जण ओरडतोय “मला घर द्या…मला घर द्या…! आणि पाहता तर काय तुमच्यासारखे हजारो जण त्या घराबाहेर उभे आहेत…! प्रत्येक जण ओरडतोय “मला घर द्या…मला घर द्या…!” एवढी गर्दी पाहून एरव्ही बिल्डर घाबरला असता. पण एकाच घरासाठी हजारो लोक भांडत असल्याचे पाहून तो खुश होतो आणि सरळ घराची किंमत वाढवून ७५ लाख करतो. या उदाहरणावरून तुम्ही बाजारातील प्रत्येक वस्तूच्या भरमसाठ वाढणाऱ्या किंमतीचा अंदाज बांधू शकता. थोडक्यात – Demand-Supply, मागणी – पुरवठाचा नियम. मागणी वाढली म्हणजे त्याचा आपसूकच परिणाम किंमतीवर होतो आणि मागणी सोबत किंमत देखील वाढीस लागते. लोकांना वाटेल की पैसे आल्यामुळे ते श्रीमंत झाले आहेत. परंतु त्यांच्या हे ध्यानी येण्यास वेळ लागेल की त्यांच्याकडे पैसा नव्हता तेव्हा ज्या वस्तूची किंमत केवळ १०० रुपये होती ती वस्तू आता ५०० रुपयांची झाली आहे. महागाई वाढल्याने लोकांचा पैसा देखील लवकर संपेल आणि परिणामी महागाईमुळे अत्यंत हलाखीची गरिबी निर्माण होईल. म्हणजे जिथून सुरु केलं तिथेच येऊन थांबण्यासारखं आहे… हे पाहून सरकारने पुन्हा पैसे छापले आणि पुन्हा लोकांमधे वाटले की स्थिती अधिकच बिकट होणार. मग दिलेल्या १ करोड रुपयांना १०,००० रुपयांची देखील किंमत राहणार नाही…! *याउलट, ज्या देशातील लोक ५० रुपये किलोच्या जागी ५ रुपये किलोने बटाटे विकत घेत असतील तर तो देश खरा श्रीमंत आहे. म्हणजेच लोकांचा पैसा त्या देशातील सरकार योग्य त्या प्रकारे वापरत आहे.* *पण याच सरकारने जर वरीलप्रमाणे लोकांना १-१ कोटी रुपये वाटले तर मात्र याच लोकांना १०० रुपये किलोने बटाटे विकत घ्यावे लागतील. आणि ते या देशाच्या हिताचे नक्कीच नसेल…!* *काय समजलात?!* *काय मग? कसं वाटलं हे गुपित?*
कधी कधी वातावरणात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते. अशा क्षेत्रात आर्द्र हवा सर्व बाजूंनी प्रवेश करते आणि वर उचलली जाते. आंतरिक प्रसरणाने ती खूपच थंड होते आणि त्यामुळे विस्तृत क्षेत्रावर जाड व मोठ्या ढगांची निर्मिती होते. टेकडी किंवा डोंगर उतारावर पायथ्याकडील वारे टेकडी किंवा डोंगरामुळे वर उचलले जातात. अशी  खूप आर्द्रतायुक्त हवा वर वर चढत जाते तेव्हा तिचे आंतरिक प्रसरण होते व त्यामुळे ती थंड होते. त्या थंडाव्यामुळे हवेतील वाफेचे सांद्रीकरण होते आणि धुके निर्माण होते. धुक्याचेच ढग होतात. *काय मग? कसं वाटलं हे गुपित?*
बाळ टक लावून पाहतं तेव्हा आपल्याला त्यात विचित्र असं काही दिसत नाहीं, पण तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलं तर एक गोष्ट दिसून येते. बाळ पापण्यांची उघडझाप न करता आपल्याकडे बघत आहे !! हेच जर कोण्या मोठ्या माणसाने केलं तर आपल्याला ते विचित्र वाटू शकतं, पण लहान बळाने आपल्याकडे टक लावून पाहिल्यास आपल्याला ते छान वाटतं. तुम्ही कधी विचार केलाय का लहान मुलं पापण्यांची उघडझाप का करत नाहीत ? मग चला उत्तर समजून घेऊया. मोठी माणसं एका मिनिटात साधारणपणे १० ते १५ वेळा पापण्यांची उघडझाप करतात, तर लहान मुलं एका मिनिटात केवळ २ वेळा पापण्यांची उघडझाप करतात. हे प्रमाण १४ वर्षानंतर वाढतं. आपण डोळ्यांची उघडझाप करतो याचं प्रमुख कारण आहे आपले डोळे हवेच्या संपर्कात येऊन कोरडे होतात. हा कोरडेपणा रोखण्यासाठी आपल्याही नकळत डोळ्यांची उघडझाप होत असते. लहानमुलांच्या डोळ्यांना अशा ओलाव्याची गरज नसते, कारण त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा झोपण्यात जात असतो. डोळे उघडे राहणे आणि डोळ्यांची उघडझाप होणे यात काहीच संबंध आढळला नाही. नजर वळवतानाच बाळ डोळ्यांची उघडझाप करतं. म्हणजे डोळे कोरडे पडू नये म्हणून डोळ्यांची उघडझाप होते. लहान मुलांसाठी त्यांच्या आजूबाजूचं जग नवीन असतं. ते सतत जागरूक असतात त्यामुळे त्यांच्या डोळ्यांची उघडझाप कमी होते. लहान मुलांचा मेंदू जागरूक तर असतोच पण बरीच माहिती साठवत असतो. यात खंड पडू नये म्हणून पापण्यांची हालचाल कमीतकमी वेळा होते. कारण बाळातले हेच गुण मोठ्यांमध्ये पण दिसतात. आपण जेव्हा पूर्ण लक्ष देऊन एखादी गोष्ट करत असतो किंवा काहीतरी ऐकत असतो तेव्हा आपल्या पापण्यांच उघडझाप कमीतकमी वेळा होते. सतत कम्प्युटरवर काम करणाऱ्यांमध्ये हे प्रमाण जास्त आढळून आलं आहे. तर, याचा अर्थ लहान बाळाच्या उत्सुकतेमुळे त्याचे डोळे सतत उघडे असतात. *काय मग? कसं वाटलं हे गुपित?*
घोडा हा इतिहासातला महत्वाचा प्राणी. आपल्यातल्या बऱ्याच जणांनी घोड्यावर रपेट मारली असेल, घोड्याची नाल दारावर लावली असेल, पण तुम्ही कधी घोड्याच्या पायांकडे बघितलं आहे का ? तिथे बोटे का नसतात ? एकच एक मोठं अर्धगोल बोट आपल्याला दिसतं. तसं पाहायला गेलं तर ही खूपच साधी गोष्ट आहे, पण तितकीच महत्वाची आहे. चला तर आज जाणून घेऊया घोड्याची बोटे गेली तरी कुठे? घोड्याच्या शरीराचा आकार वाढला तसतसा त्याच्या ३ बोटांमध्ये बदल होत गेला. सगळा भार हा मधल्या बोटावर आला. या कारणाने मधल्या बोटाचा आकार वाढला. पुढे जाऊन अशी परिस्थिती निर्माण झाली की बाजूची २ बोटे अडथळा निर्माण करू लागली. तर, बोटं नाहीशी होण्याचं हे एक कारण झालं. दुसरं कारण थोडं वेगळं आहे. कुत्रा किंवा मांजरीचा पायाचा तळवा बघितला तर आपल्याला मऊ भाग दिसतो, पण हा भाग घोड्याच्या पायांना नसतो. घोड्याला दुडक्या चालीने धावण्यासाठी हा मऊ भाग नाहीसा झालेला आहे. आणि बोटे नाहीशी झाल्याशिवाय हा भाग नष्ट होणे शक्यच नव्हतं. उत्क्रांतीत घोड्याची पुढची बोटे नाहीशी झाली असली तरी मागच्या बाजूला अजूनही बोटे असल्याच्या खुणा दिसतात. हा भाग केसांनी वेढलेला असतो. अजूनही उत्क्रांती थांबलेली नाही. विज्ञानाच्या मते काही दिवसात मागची बोटे पण नाहीशी होऊ शकतात. एकंदरीत घोड्याची ओळख असलेला त्याचा वेग उत्क्रांत होण्याची ही प्रक्रिया आहे. *काय मग? कसं वाटलं हे गुपित ?
छोटं बाळ हसू लागलं की लोक याची बरीच कारणं सांगतात. काय तर म्हणे सटवाई हसवते, स्वप्नात देवबाप्पा येऊन गुदगुल्या करतो, एक ना दोन!! पण विज्ञान या बाबतीत वेगळीच माहिती सांगतं. बाळ जन्मल्यावर त्याच्या मेंदूत तेवढीच माहिती असते जेवढी आपल्या नवीन मेमरी कार्डमध्ये असते. म्हणजे अगदी रिकामं. बाळ जसजसं मोठं होत जातं,  तसं त्याला आजूबाजूच्या गोष्टींचं ज्ञान येऊ लागतं. त्यामुळे सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये त्याला स्वप्न पडण्याची शक्यताच नसते. मग बाळ का हसत असेल? उत्तर वाचून तुम्हालाच हसू येईल. सुरुवातीच्या, विशेषतः २ ते ४ आठवड्यात बाळाच्या हास्यामागचं कारण असतं पोटातून बाहेर पडणारा गॅस. बसला ना धक्का?  ४ आठवड्यापर्यंत किंवा त्यानंतरही बाळ जर डोळे मिटून हसत असेल, तर शक्यता आहे की त्याने नुकतंच गॅस पास केला आहे. घरात बाळ असेल तर तुम्ही निरीक्षण करू शकता. शास्त्रज्ञांच्या मते १ महिन्यापर्यंत बाळाच्या हास्यामागे कोणतंही भावनिक कारण नसतं, किंवा आई-वडील यांच्याशीही ते निगडीत नसतं. बाळ १ महिन्याचं झाल्यानंतरच्या हास्याला त्याच्या मेंदूत होणारे बदल कारणीभूत असतात. म्हणजे दिवसभर आलेल्या अनुभवांवर रात्री प्रक्रिया होत असते. यातूनच काहीवेळा अचानक बाळाच्या चेहऱ्यावर लाघवी हसू पसरतं, तर काहीवेळा बाळ अचानक रडूही लागतं.याकाळात बाळाच्या मेंदूत भावभावना विकसित होत असतात. ‘REM स्लीप’ फेजमध्ये बाळाला सर्वात जास्त स्वप्नं पडत असतात. स्वप्नात दिसणाऱ्या घटनांमुळे त्याच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव प्रकट होत असतात.  REM स्लीप हा प्रकार सर्व वयातील माणसांमध्ये आढळतो. या प्रकारात डोळ्यांची जलद उघडझाप होत असते आणि शरीर एकप्रकारे लकवा मारलेल्या स्थितीत जातं. पण मेंदू जागृत असतो. याच स्थितीत स्वप्नं पडतात. बाळाच्या शरीरात यावेळी बदल होत असतात, त्या बदलातूनच हास्यासारखी भावना बाहेर उमटते. विज्ञान म्हणतं की बाळ जन्मल्यानंतर त्याला केवळ १ ते २ फुटांपर्यंतच फक्त दिसतं. पहिल्या महिन्यानंतर बाळाची नजर स्थिर व्हायला सुरुवात होते. त्यानंतर बाळ हळूहळू आई वडिलांचा चेहरा ओळखू लागतं. यानंतर बाळ ओळखीच्या व्यक्तींकडे स्थिर नजर ठेवून बघण्यास सुरुवात करतं. या शारीरिक बदलांचा परिणाम त्याच्या हावभावांवर होत असतो. जन्माच्या ६ ते ८ महिन्यांनी बाळ ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींकडे बघून हसतं. याला वैज्ञानिक भाषेत ‘सोशल स्माईल’ म्हणतात. हे हसू स्वतःहून आलेलं असतं. या टप्प्यापर्यंत बाळाची नजर जवळजवळ स्थिर झालेली असते. म्हणजे गॅस पास करणं हे एकच कारण तोपर्यंत उरत नाही. आपण लहानपणापासून बाळाच्या हास्याबद्दल काही समजुती बाळगून होतो, त्या सगळ्या समजुतींना सुरुंग लागला असेल ना? पण काय करणार? *हेच सत्य आहे.* *काय मग? कसं वाटलं हे गुपित?*
खेडोपाडी सर्व लोकांमधे थोड्याफार प्रमाणात ही पद्धत आज ही अस्तित्वात आहे. दुसरी गोष्ट, ताट किंवा पाना भोवती पाण्याचं वर्तुळ काढून कीडा, मुंग्या, माकोडे रोखता येतात हे बरोबर आहे, परंतू आपण जर असं करणाऱ्याचं निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल की, जेवणाच्या भोवती वर्तुळ काढून झाल्या नंतर लोकं उर्वरीत पाणी प्राशन करून नंतर ताटा ला श्रद्धा पूर्वक वंदन करून नंतर च जेवणाला सुरूवात करतात. या कृत्या चा अर्थ असा कि अन्न हे पुर्न ब्रह्म आहे व ते देणाऱ्या परमेश्वराचे आभार मानुन मी ते आदर पुर्वक ग्रहण करत आहे. कृपया अन्न वाया घालवू नका. हा संदेश या कृत्या मागे आहे. कृपया आपन सर्वांनी अन्न वाया जाणार नाही याचं पालन करावं ही हात जोडून विनंती. *काय मग? कसं वाटलं हे गुपित?*
काही वेळेस काय होतं जर तुम्ही खूप सारे फोल्डर तयार केले असतील तर ते लवकर दिसत नाहीत तेव्हा रिफ्रेश बटन दाबलं कि ते दिसतात. एखादा शॉर्टकट डेक्सटॉप वर ऍड करता पण ते दिसत नाही तेव्हा रिफ्रेश चा उपायोग होतो. डेक्सटॉप वरचे आयकॉन रिअलाइन जाण्यासाठी रिफ्रेश बटणाचा उपयोग होतो. बाकी त्याचा काही उपयोग नाही. जर तुम्हाला वाटत असेल कि रिफ्रेश बाटन दाबल्यावर संगणक फास्ट काम करेल तर मुळात तस काहीच होत नाही. *काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

एखाद्या मोठ्या रेल्वेस्थानका कडे कूच करत असताना समोर दिसणारे बहुसंख्य रूळ पाहून रेल्वेचालक गोंधळून जाण्याची नक्कीच शक्यता असते.

परंतु तसे होत नाही, कारण मुळात कुठल्या रुळावरून चालायचे हे रेल्वेचालाकाच्या हातात नसते.

रेल्वेचालकांना रेल्वे रुळांचे आकलन करण्याची गरज नसते, रेल्वे अपोआप त्याच रुळांवरून धावते ज्या रुळांची जोडणी रेल्वेला दिलेली असते.

आणि कुठल्या रुळाची जोडणी द्यायची हे संपूर्णतः रेल्वेच्या स्थानक व ब्लॉक सेक्शन नियंत्रकांच्या हातात असते.

रेल्वेचे स्थानक नियंत्रक रेल्वेची एका रुळांवरून इतर रुळांवर होणारी वळणे नियंत्रित करतात.

मुख्यतः, ज्या स्थानकांवर दोनपेक्षा अधिक रुळांची उपलब्धता असते अशाच स्थानकांवर ह्या प्रकारचे नियंत्रण केले जाते. रेल्वेचालक केवळ रेल्वेचा वेग नियंत्रित करू शकतात.

रेल्वेचालकांना ते चालवत असलेल्या विभागांची खडानखडा माहिती असते. त्यामुळे कुठल्या रुळांवरून रेल्वे कशी नियंत्रित करायची ह्याचा त्यांना व्यवस्थित अनुभव असतो. त्याकरिता रेल्वेचालकांना विशेष प्रशिक्षण दिले जाते.

ज्या स्थानकांच्या बाहेर, अनेक रुळांचे जाळे पसरलेले असते, त्या स्थानकापासून काही अंतरावर एक विशेष सिग्नल बसवलेले असते. ह्या सिग्नलला "होम सिग्नल" म्हणतात.

ह्याला सिग्नलला दिव्यांसोबतच काही पंख जोडलेले असतात. पंख्यांच्या दिशेवरून आणि त्यामध्ये चालू होणाऱ्या दिव्यांवरून रेल्वेचालकाला ह्या गोष्टीचा इशारा केला जातो, कि तिथून पुढे ती रेल्वे कुठल्या रुळावर (अथवा फलाटावर) नेली जात आहे आणि त्यानुसार चालकाने किती वेगाने रेल्वे घेऊन जायची आहे.

काही आधुनिक सिग्नल यंत्रणेत फलाट क्रमांक देखील लिहून दाखवला जातो. ह्याद्वारे रेल्वेचालकाला केवळ रुळांची कल्पना दिली जाते, मात्र कुठल्या रुळावर जायचे ह्यावर चालकाचे नियंत्रण नसते.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

*समुद्रात किंवा नदीमध्ये अंघोळ करत असताना आपण पाण्यात बुडायची भीती मनाच्या एका कोपऱ्यात घर करून असते. पण मृत समुद्र हा असा एक समुद्र आहे ज्यामध्ये कोणी ठरवून देखील बुडू शकत नाही.

आश्चर्य वाटलं ना? पण हे खरंय !*

मृत समुद्र हा जगातील सर्वांत छोटा आणि कमी क्षेत्रफळावर पसरलेला समुद्र आहे. हा इझ्राएल-जॉर्डन या देशांच्या दरम्यानचा एक नैसर्गिक जलाशय आहे. ‘समुद्र’ या अपसंज्ञेने तो ओळखला जातो.*

त्याचा नैर्ऋत्य भाग इझ्राएलमध्ये व इतर भाग जॉर्डनमध्ये मोडतो. हा समुद्र ६५ किलोमीटर लांब आणि ८ किलोमीटर रुंद आहे. हा समुद्र १३७५ फूट खोल आहे. मृत समुद्राला पृथ्वीचा सर्वांत खालचा बिंदू मानले जाते. मृत समुद्राला मुख्यत्वे जॉर्डन नदी आणि इतर छोट्या नद्या येऊन मिळतात. हा जगातील सर्वाधिक क्षारता असलेला (साधारण इतर सागरजलापेक्षा ७ ते १० पटींनी अधिक क्षारता) समुद्र आहे.*

भूरचनादृष्ट्या हा समुद्र जॉर्डनच्या भल्या मोठ्या खचदरीचा भाग आहे.* शास्रज्ञांच्या मते तृतीयक कालखंडातील पृथ्वीच्या हालचालींमुळे या समुद्राची निर्मिती झाली असावी, हे याच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंस असलेल्या डोंगररांगांच्या तीव्र कड्यांच्या अभ्यासावरून दिसून येते.

तसं पाहिलं तर प्रत्येक समुद्राचं पाणी खारटच असतं, पण मृत समुद्राचे पाणी इतर समुद्राच्या तुलनेत ३३% अधिक खारट आहे. हा कारणामुळेच या पाण्यात जलचारांचे अस्तित्व देखील आढळत नाही.यात मासे किंवा अन्य जलजीव

पण हे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या पाण्याने अंघोळ केली असता कित्ये ग नष्ट होतात. लवण, पोटॅश व ब्रोमीन एवढीच या समुद्रातून मिळणारी उत्पादने होत. सामान्य पाण्याच्या तुलनेत मृत समुद्राच्या पाण्यात २० पट जास्त ब्रोमीन, ५० पट जास्त मैग्निशियम, आणि १० पटीने अधिक लवण म्हणजेच आयोडीन असते.

यातील ब्रोमीन धमन्यांना शांत करते, मॅग्नेशियम त्वचेची ऍलर्जी दूर करते आणि आयोडीन कित्येक ग्रंथींची क्रियाशीलता वाढविण्याचे काम करते.

सडोम व गमॉर ही प्राचीन शहरे याच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावर होती. विद्यमान सडोम येथे मीठ उत्पादन केले जाते. या समुद्रात मीठाचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे मृतसागरातील पाण्याचे घनत्व अधिक आहे. त्यामुळे या समुद्रात कोणीही बुडत नाही.

ही गोष्ट इथे येणारे पर्यटक खूप एन्जॉय करतात. या ठिकाणी पाण्यात राहून तुम्ही अनेक गोष्टी करू शकता, जसे की, वर्तमानपत्र वाचणे, मासिके वाचणे, चहा- कॉफी किंवा ज्युसचा आस्वाद घेणे.

या वैशिष्ट्यांमुळे इथले पर्यटन विकसित झाले आहे. हा प्रसिद्ध पिकनिक स्पॉट बनला आहे. समुद्रकिनारी हॉटेल्स बांधली गेली आहेत.

या सागराचे पाणी खूप गुणकारी आहे. याच्या उपयुक्ततेच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. असं म्हणतात की क्लिओपात्रा देखील या समुद्रातील पाण्याचा वापर आपले सौंदर्य वाढविण्यासाठी करत असे.

मात्र आता हळूहळू या सागराचे पाणी कमी होऊ लागले आहे. या समुद्राला मिळणाऱ्या जलाशयांनी आपला पाण्याचा रस्ता बदलला आहे. याशिवाय मिनरल इंडस्ट्री सुद्धा यातील पाण्याचा बऱ्याच प्रमाणात वापर करत आहे. शिवाय या पाण्याचा वापर करून कॉस्मेटिक इंडस्ट्रीज सौंदर्यप्रसाधने निर्माण करत आहेत.

हे असेच चालू राहिले तर या समुद्रातील पाणी वारंवार उपसले जाऊन एक दिवस या सागराचे अस्तित्वच संपेल.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

अनेकदा लोक थोडे आजारी पडले, ताप, सर्दी- खोकला झाला तर डॉक्टरांकडे न जाता थेट मेडिकल स्टोरमध्ये जाऊन कशाचाही विचार न करता औषधे खरेदी करतात.

काही वेळा या औषधांनी आराम मिळतो सुद्धा, पण काही वेळा याचे गंभीर परिणामही भोगावे लागतात.

तुम्ही कधी लक्ष दिलं तर असं लक्षात येईल की, गोळ्यांच्या स्ट्रीपवर लाल रंगाची रेष असते. पण याचा अर्थ काय होतो हे माहीत आहे का? नाही ना? चला जाणून घेऊन या लाल रेषेचा अर्थ.

लाल रंगाच्या या रेषेबाबत डॉक्टरांना चांगलं माहीत असतं. पण सर्वसामान्य लोकांना याची काहीच माहिती नसते. अशात लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध

मेडिकलमधून घेतात आणि नंतर त्यांना समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे औषधांची खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. गोळ्यांच्या स्ट्रीपवर असलेल्या लाल रंगाच्या रेषेचा अर्थ असा होतो की, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ना हे औषध विकलं जाऊ शकत ना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करता येतो. अ‍ॅंटी-बायोटिक औषधांचा चुकीच्या
पद्धतीने होणारा वापर रोखण्यासाठी गोळ्यांच्या स्ट्रीपवर ही लाल रंगाची रेष काढलेली असते.

लाल रंगाच्या रेषेशिवाय औषधांच्या स्ट्रीपवर आणखीही बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या असतात. ज्यांबाबत तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. 

काही गोळ्यांच्या पाकिटांवर Rx असं लिहिलेलं असतं, ज्याचा अर्थ असा होतो की, हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं.

तर औषधांच्या ज्या पाकिटांवर NRx लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ असा होतो की, हे औषध घेण्याचा सल्ला फक्त तेच डॉक्टर देऊ शकतात ज्यांना नशेच्या औषधांचं
लायसन्स असतं.

काही औषधांच्या पाकिटांवर XRx लिहिलेलं असतं आणि याचा अर्थ होतो की, हे औषध केवळ डॉक्टरांकडूनच घेतलं जाऊ शकतं. हे औषध डॉक्टर थेट रूग्णांना देऊ शकतात. रूग्ण हे औषध कोणत्याही मेडिकल स्टोरमध्ये खरेदी करू शकत नाहीत. भलेही डॉक्टरांनी चिठ्ठी लिहून दिली असेल.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

जवळपास सगळ्याच डायअर्थ्रोडील (Diarthrodial) जोड असलेल्या हाडांमध्ये “ट्यांक” असा आवाज येतो. हे जोड प्रामुख्याने हाताचे जोड असतात, पायाचे जोड असतात. परंतु काही डायअर्थ्रोडील जोड नसून सुद्धा त्यांच्यातून “ट्यांक” असा आवाज येतोच जसे की मान, पाठीचा कना, गुडघे, कंबरेचा भाग इत्यादी. 

आपले हाडांचे जोड हे एका विशीष्ट द्रव्याने भरलेलं असते ज्याला Synovial Fluid, सिनोविअल द्रव्य म्हणतात. ह्या द्रव्याचे काम हाडांच्या जोडला पोषक तत्वे पुरवणे, घर्षण होऊ न देणे, एक लवचिकता बनवून ठेवणे हे असते.

आता द्रव्य म्हटलं म्हणजे त्यात बऱ्याच अंशी पाणी असते आणि पाण्यात असतात बरेच वायु. सिनोविअल द्रव्यात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असते.

जेव्हा आपण ह्या जोडला ओढतो, विरुद्ध दिशेने खेचतो तेव्हा हे सिनोविअल द्रव्य प्रसरण पावते. खूप काळापासून सिनोविअल द्रव्य जसेच्या तसे राहिलेले असल्यामुळे जोड असलेल्या जागेत हवेचा दाब जास्त असतो त्यामुळे ते द्रव्य हाडांना घट्ट चिकटलेले असते. परंतु जेव्हा हाड वेगळी होतात, त्यांच्यातले अंतर वाढते तेव्हा ह्या द्रव्यात हवेचा दाब कमी

होऊन बऱ्याच ठिकाणी पोकळी (Vaccum) तयार होते. पोकळी का तयार होते कारण की हाड लांब सरकतात पण द्रव्य तेवढच राहते म्हणून. ह्या पोकळी मी खाली दाखवल्या आहेत.

जेव्हा ह्या पोकळी तयार होतात तेव्हा सिनोविअल द्रव्यात विरघळलेले वायू जसे की कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजनचे बुडबुडे तयार होतात. अनेक बुडबुडे एकमेकांना मिळून मोठे बुडबुडे तयार होतात. जेव्हा ही लहान बुडबुडे एकमेकांना मिळतात तेव्हा “ट्यांक” असा आवाज तिथे होतो. काही मोठी बुडबुडे लगेच फुटतात तर काही बुडबुडे तशीच त्या द्रव्यात
राहतात.

आपण जेव्हा जास्त दबाव असलेल्या सोड्याचा बाटलीला उघडतो तेव्हा त्याच्यात कसे बुडबुडे तयार होतात आणि टपटप आवाज येतो अगदी तसेच हे सुद्धा होते. परत हाडे आपापल्या जागेवर आली असता काही बुडबुडे तशीच राहतात आणि हळूहळू हवेचा दाब त्यात स्थिर होत जातो. त्यामुळे हे वायूचे बुडबुडे परत त्या सिनोविअल द्रव्यात विरघळतात आणि सगळे पूर्वीसारखे होते. वायूचा दाब स्थिर व्हायला आणि ह्या पोकळ्या भरून काढायला कमीतकमी २० मिनिटे लागतात आणि म्हणून आपण दुसऱ्यांदा लगेच बोट

मोडली की आवाज येत नाही कारण द्रव्यात विरघळलेले वायूचे प्रमाण कमीच असते.

 हे असे करणे चांगले असते का?

नीट पाहिले असता ह्यामुळे काही नुकसान वैगरे होत नाही किंवा हाडांना इजा वैगरे होत नाही. काहीजण म्हणतात बोट मोडणे चांगले असते काही म्हणतात चांगले नसते परंतु दोघांसाठी काही ठोस पुरावे सापडलेले नाहीत.

काय मग? कसं वाटलं हे गुपित?

चिनी लोक कधी काय करतील, काही सांगता येत नाही…उगाच का त्यांना ” अजब लोकांचा देश” म्हणतात…!! 

चिनी  लोक हा सूर्य कसा तयार करत आहेत ते थोडक्यात पाहू!!

चीनचा हा सूर्य, नैसर्गिक सूर्यापेक्षा दहा पटीने जास्त ऊर्जा देणारा आहे. 

सूर्याचे तापमान हे 1.5 करोड डिग्री सेल्सिअस आहे, तर चीनच्या कृत्रिम सूर्याचे तापमान 10 करोड डिग्री सेल्सिअस असणार आहे.

या योजनेचे “एक्सपेरिमेंनटल ऍडव्हान्सड सुपरकंडक्टटिंग टोकामक (EAST)” असे नामकरण करण्यात आले आहे.

या मशिनद्वारे याची चाचणी सुरू आहे. मशीन चालू करण्यासाठी दिवसाला 15 लाख रुपये खर्च येतो.

आता याचे फायदे काय आहेत ते पाहू…

सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशामध्ये काही हानिकारक किरणेही असतात, जसे की अतिनील किरणे…

पण कृत्रिम सूर्यापासून मिळणारा प्रकाश हा पूर्णपणे स्वच्छ असेल, शिवाय खराब वातावरणातही हा सूर्य प्रकाश देऊ शकतो असा दावा चीनी संशोधकांनी केला आहे. हा सूर्य 2020 नंतर कार्यान्वित होईल.

याबरोबरच चीनने काही वर्षांपूर्वी कृत्रिम चंद्र बनवणार असल्याचेही सांगितले होते. त्यासाठीही चीनी संशोधक प्रयत्नशील आहेत. हा चंद्र रात्रीच्यावेळी रस्त्यांवर 80 किलोमीटर पर्यंत प्रकाश देऊ शकतो.

चिनी लोकांच्या या भन्नाट संशोधनाने जगाला काही धोका निर्माण होऊ नये म्हणजे झालं!!!

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

झोपेत जर स्वप्नात तुम्ही खूप मोठ्या मेजवानी वर ताव मारताना पाहिले तर खरच तुमचं पोट भरत का जाग आल्यावर भूक लागलेली असू शकते. 

ही जी cognition अर्थात आकलनाची यंत्रणा आहे ती आपण झोपेत असताना बंद करून ठेवली जाते म्हूणून तुम्ही झोपेत काही ऐकू शकत नाही.

कानात जे ध्वनी कंपन जाते त्याला मेंदू एका समजण्या सारख्या सिग्नल मध्ये परिवर्तित करते. आपल्या डोक्यातील ती nerve जी आपल्याला ऐकण्यास मदत करत असते. तो सिग्नल पुढे मेंदूला कळवला जातो आणि मग तो ठरवतो की मला हे आकलन झाले!

प्रश्नाचे उत्तर असे आहे की ही जी आकलनाची प्रक्रिया आहे ती झोप लागल्यावर बंद पडते आणि  म्हणून ऐकायला येत नाही!!

‍फक्त सकाळी अलार्म कसा ऐकू येतो याचे उत्तर आहे की आधी त्याच्या आवाजांनी जाग येते आणि मग तो ऐकू येतो. पण जाग आली नाहीतर ऐकू येत नाही.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

जगात असा कुठलाच देश नाही, जिथे कधीच रात्र होत नाही! परंतु, यास काही ठिकाणे काहीअंशी अपवाद आहेत. जिथे सलग दोन-तीन महिने रात्र होत नाही! 

*कॅनडा :* या देशात उन्हाळ्यात तब्बल 50 दिवस सलग दिवस असतो!

*नॉर्वे:*
या देशात मे ते जुलै असे तीन महिने सर्वत्र उजेडच असतो!

*आईसलँड:*
या युरोपातील बेटसदृश देशात तब्बल तीन महिने रात्र होत नाही!

*फिनलँड :*
इथे उन्हाळ्यात तब्बल 78 दिवस सलग सूर्यप्रकाश असतो!

*अलास्का :*
या ठिकाणी मे ते जुलै असे तीन महिने रात्र होत नाही!

ही प्रमुख ठिकाणे झालीत. शिवाय अन्य काही ठिकाणे या यादीत मोडतात.

सूर्य जेव्हा ध्रुव अवस्थेत क्षिताजाच्या खाली राहतो, तेव्हा अशी स्थिती निर्माण होते. अशा घटनेला पोलर नाईट म्हणून ओळखले जाते.

आणि यासाठी पृथ्वीचे स्वत:भोवती फिरणे कारणीभूत ठरते. कारण, पृथ्वी आपल्या अक्षावर (आसावर) 23.5 अंश झुकलेली आहेत.

पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे सूर्याभोवती फिरत असते. मात्र, ती स्वत:भोवती फिरत असताना संबंधित भाग अधिक काळ सूर्यासमोर असतो. परिणामी त्या ठिकाणी रात्र होत नाही!

परंतु, ही स्थिती काही काळच असते. अन्य वेळी तिथे सर्वसामान्य स्थिती असते.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

आपण श्वास घेतो तो ऑक्सिजन असतो अस आपल्याला वाटत. परंतु आपण श्वास घेतो ती हवा असते आणि हवेत ऑक्सिजनचे प्रमाण फक्त २०.९% एवढेच असते. 

आता जी हवा आत घेतली जातेय ती नक्कीच आपल्या श्वासनलिकेतून पुढे जाते. ह्या हवेमध्ये धुळीचे कण असतात, प्राण्यांचे केस असतात, परागकण असतात.

नाकाच्या वरच्या भागात आणि दोन्ही भुवयांच्या थोडं खाली नसल म्युकोसा (Nasal Mucosa) असतो जो हवेत काहीतरी नको असलेलं आलं आहे त्याची खात्री करतो आणि आपल्या मेंदूच्या Medulla भागाला संदेश देतो की शिंक जोरात.

सर्दीच्या वेळेस आपले नसल म्युकोसा सामान्यतेपेक्षा २०% अधिक संवेदनशील झालेले असते म्हणून सर्दी असतांना थोडं काही झालं की शिंका येतात.

शिंकताना पूर्ण शरीर आकुंचन पावत, मोठा श्वास घेतला जातो आणि जोरात “आ!!!!क्चु” म्हणून आत घेतलेली हवा तोंडावाटे आणि नाकावाटे बाहेर फेकली जाते आणि परत नसल म्युकोसा पडताळून पाहतो की जे होत ते गेल की नाही.

एका शिंकेमध्ये जवळपास ५००० नको असलेले कण नाकावाटे आणि तोंडावाटे बाहेर फेकले जातात.

शिंकण्याची गती अतिशय जास्त असते. नाकातून, तोंडातून हवा तब्बल १६० किलोमीटर प्रती तास इतक्या वेगाने बाहेर फेकली जाते.नाकातली हवा जवळपास १५० सेंटीमीटर लांब फेकली जाते.

*पण मग डोळे का बंद होतात?*

ह्यामागचे खरे कारण अजूनही समजू शकले नाहीय. शिंकणे ही क्रिया आकस्मिक (Involuntary) म्हणजेच जिच्यावर आपला फारसा कंट्रोल नसतो अशी आहे.

शिंकताना छाती फुलते, डोळे बंद होतात आणि जेव्हा शिंक निघते तेव्हा डोकं पुढे ढकलले जाते. डोक आपल्या नाकाला एक धक्का (Jerk) मिळावा जेणेकरून हवेची गती वाढावी म्हणून जोरात पुढे जाते.

एक कारण असेही की जे नको असलेले कण बाहेर आले आहेत ते डोळ्यांमध्ये जाऊ नये. शिवाय डोक जेव्हा पुढे जात तेव्हा डोळ्यांवर अतिरिक्त ताण पडू नये म्हणून डोळे बंद होतात कारण डोळे नाजूक असतात.

*परंतु डोळे उघडे असतांना शिंकणे शक्य आहे, त्यामुळे ते बाहेर येतात असं नव्हे.*

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

इंजिनीअरिंगमध्ये बायोमिमेटिक्स नावाचा शब्द अनेकदा वाचायला मिळतो. हा शब्द बायो आणि मिमिक्री अशा दोन शब्दांपासून बनला आहे. बायोमिमेटिक्स म्हणजे असे तंत्रज्ञान जे जिवंत वस्तुंची नक्कल करुन बनवण्यात आलेले असते. विमान हे बायोमिमेटिक्सचे सर्वात उत्तम उदाहरण आहे. 

माणसाला उडता येत नाही, कारण माणसाच्या शरीराची रचनाच अशी असते की त्याला उडता येणार नाही. पण उडणारे पक्षी बघून माणसाने पक्षांच्या शरीरासारखेच विमान बनवले आणि त्यात बसून माणूस उडू लागला.

विमानांच्या कसरतीवेळी आपण बघितले असेल ती विमाने आकाशात V आकाराची रांग करुन उडत असतात, ही युक्ती सुद्धा पक्षांच्या थव्याकडूनच घेतली आहे. पण पक्षांचे थवे V आकारातच का उडतात.

सगळेच पक्षी V आकाराच्या थव्यात उडत नाहीत. काही स्थलांतर करणारे पक्षीच असे करतात. लांबीचे अंतर पार करणारे फिरस्ते पक्षीच V आकाराच्या थव्यांमध्ये उडतात. परंतु हे पक्षी असे का करतात ? का पक्षांचाही उडण्याचा स्वतःचा असा काही स्वॅग असतो ? तर नाही !

आपण जहाज चालताना पाहिले असेल. जहाज जेव्हा पुढे जात असते तेव्हा त्याच्या अगदी पाठीमागचे पाणी खाली दाबले जाते आणि बाजूचे पाणी वर उसळते. पक्षी जेव्हा हवेत उडत असतात तेव्हा अगदी असाच सीन असतो.

पक्षी हवेत उडताना ते जसजसे पुढे जातात, तसतशी त्यांच्या पाठमागची हवा खाली दाबली जाते आणि बाजूची हवा वर जाते. ही बाजूची वर आलेली हवा दुसऱ्या पक्षांसाठी एकप्रकारे इंधनाचेच काम करते.

पक्षांना हवेत राहण्यासाठी ऊर्जा लागते. बाजूने वर येणारी हवा पक्षांना वर हवेत ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे पक्षांची ऊर्जा वाचते.

त्यामुळे एखादा पक्षी पुढे उडत असेल तर आपले इंधन म्हणजेच ऊर्जा वाचवण्यासाठी दुसरे पक्षी त्यांच्या बाजूने उडतात आणि थव्याला V आकार प्राप्त होतो. *ठराविक वेळेनंतर म्होरक्या बदलतात*

पक्षांच्या V आकारात हवेत उडण्याची संज्ञा वैज्ञानिक भाषेत बर्बल म्हणून ओळखली जाते. V आकारात उडणाऱ्या पक्षांच्या थव्यात पुढच्या टोकाला जो पक्षी असतो त्याला इतर पक्षांच्या तुलनेत जास्त मेहनत करावी लागते.

म्होरक्याला बर्बलचा नाही. म्हणूनच पक्षी एकमेकांच्या समजूतदारीने ठराविक वेळेनंतर आपला म्होरक्या बदलून एका कुणावर जास्त भर पडून देत नाहीत आणि सर्वांना सामान संधी दिली जाते.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

यासाठी संशोधकांनी उंदीरांवर प्रयोग केले आणि त्यांना असे दिसून आले की उंदीर एकमेकांना गुदगुल्या करतात आणि मानवाप्रमाणेच प्रतिक्रिया देतात.

संशोधकांना असे आढळले आहे की जेव्हा कोणीतरी उंदीर स्वत: ला गुदगुल्या करतो तेव्हा उंदरांचा मेंदू वेगळा प्रतिसाद देतो. 

जेव्हा उंदीर स्वतःला गुदगुल्या करतात तेव्हा त्यांच्या मेंदूचा जो भाग हसण्यासाठी कार्य करतो तो सक्रिय नाही.

जेव्हा संशोधकांनी उंदरांना गुदगुल्या केल्या तेव्हा त्यांच्या मेंदूत स्पर्श झाल्याचे सिग्नल आले. त्याला सोमाटेन्सरी सिस्टम म्हणतात. या कारणास्तव, उंदीरांनी प्रतिक्रिया दिली आणि गुदगुल्या केल्यावर आवाज दिला.

*यामागील कारण काय आहे?*

जेव्हा शरीराला स्वतःला स्पर्श केला की प्रतिक्रिया येत नाही. तेव्हा स्वतःला गुदगुल्या केल्यावरही तेच असतं.

स्पर्श केल्यावर उंदीर आणि मानवांची प्रतिक्रिया एकसारखीच असते. जेव्हा आपण स्वतः गुदगुल्या करतो तेव्हा आपले मेंदू आधीच यासाठी तयार आहे, म्हणून इतरांनी गुदगुल्या केल्यासारखे प्रतिक्रिया देत नाही.

जर आपण स्वतःला स्पर्श केला किंवा गुदगुल्या केल्या तर आपल्या मेंदूला हे माहित आहे की स्पर्श करणे हानिकारक आणि महत्वाचे नाही. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया तो देत नाही.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

ओठा मध्ये तेल उत्पादन करणाऱ्या ग्रंथी (oil production glands) नसतात.

हिवाळ्यामध्ये हवेत आर्द्रता कमी असल्याने ओठ सुकतात व सतत कोरडे होतात. 

हा कोरडेपणा घालवण्यासाठी मग सतत ओठांवरून जीभ फिरवली जाते.

पण त्यामुळे ओठांमधील ओलावा अधिकच कमी होतो. आणि ओठ फाटतात.

यावर घरगुती व नैसर्गिक उपाय म्हणून तूप लावणं फायदेशीर ठरतं.

त्यामुळे ओठ सुकण्याची प्रक्रिया मंदावते व ओठांमधील ओलावा टिकून राहतो.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

*शाळेतील मुलाचा प्रश्न आहे*

*एका शब्दात उत्तर: नाही..!*

*आपल्या मुलासाठी स्पष्टीकरण:* 

एव्हढी लांब शिडी तयार करणे आपल्याला सध्या तरी शक्य नाही.

*आपल्यासाठी स्पष्टीकरण:*

असा पदार्थ/धातू अजून आपल्याला ज्ञात नाहीये जो ४ लाख किमी.लांब असून, मधे कोणताही आधार न घेता स्वतःचे वजन सांभाळू शकेल.

समजा कोणी ४,०५,००० किमी. उंच अशी शिडी तयार केलीच आणि ती शिडी स्वतःचे वजन सांभाळू शकेल अश्या पदार्थाची/धातूची बनली तरी हे शक्य नाहीये.

चंद्राचे पृथ्वीभोवती फिरण्याचे अंतर ३,६०,००० किमी. ते ४,०५,००० किमी. पर्यंत बदलत असते. म्हणजे साधारण ४५,००० किमी. चा फरक या शिडीला कमी जास्त करता आला पाहिजे. त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान अजूनतरी (माझ्या माहितीत) विकसित झालेले नाही. पण…

चंद्रापर्यंत नाही तर भूस्थिर कक्षेच्या पलीकडे एक उदवाहकलिफ्ट तयार करता येऊ शकेल.

साधारण ३६००० किमी. वर भूस्थिर कक्षा आहे. तिथे पर्यंत एक दोरी सोडायची जिची एक बाजू पृथ्वीवर बांधली असेल आणि दुसऱ्या बाजूला त्या दोरीच्या वजनाला भारनियमन (counter balance) करणारे वजन बांधले तर हे शक्य आहे.

या दोरीवरून Rope -Way प्रमाणे आपण ये-जा करू शकू. अवकाश उद्वाहक (Space Elevator) खालील चित्रांद्वारे स्पष्ट होईल.

भूस्थिर कक्षा म्हणजे उपग्रह किंवा या उत्तराच्या अनुषंगाने उद्वाहकाचा भारनियमक अश्या अंतरावर असेल तिथून तो पृथ्वीच्या परिवलन गतीएवढा वेग धारण करू शकेल. म्हणजेच तो आपल्याला पृथ्वीसापेक्ष पाहताना एकाच जागी आहे असे दिसेल.

इतर आपण सोडलेले कृत्रिम उपग्रह आपली गती बदलताना दिसतात आणि ते पृथ्वीभोवती २४ तासात एक पेक्षा

जास्ती फेऱ्या मारतात. भूस्थिर उपग्रह २४ तासात एकच फेरी पूर्ण करतो त्यामुळे तो आपल्याला अवकाशात स्थिर भासतो.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

मधमाश्यांच्या पोळ्याची लोकसंख्या हि एका छोट्या खेडेगावाएवढी असते. एका पोळ्यात ६० ते ७० हजार मधमाश्या असतात. 

यातल्या कामगार मधमाश्यांचे काम असते ते म्हणजे त्यांच्या पोळ्यापासून ३-४ किमी. च्या परिसरात असणाऱ्या फुलातून मकरंद काढून आणणे.

मधमाशी जेव्हा एका फुलातून मकरंद काढून आणते, तो मध नसतो. मकरंद म्हणजे फुलांनी मधमाशा, भुंगे आणि फुलपाखरे याना दिलेली लाच असते. मकरंद घेताना या सर्व ‘लाचखाऊ’ लोकांच्या पायाला, शरीराला, फुलांचे पुंकेसर अथवा स्त्रीकेसर चिकटतात आणि त्यातूनच फुलांच्या परागीभवनाला मदत मिळते.

जेव्हा हा मकरंद मधमाशीच्या तोंडात असतो, तेव्हा तिच्या तोंडातून एक विशिष्ट प्रकारचे वितंचक (Enzyme) स्रवते, जे या मकरंदासोबत मिसळते. या वितंचकाचे काम असते मकरंदाला जास्तीतजास्त शुद्ध करणे. म्हणजे जेव्हा मध पूर्ण तयार होतो तेव्हा त्यात अगदी थोडे पाणी आणि खूप जास्त साखर उरते. शुद्ध मधाचे गुणोत्तर हे १७% पाणी व ८३% साखर असते. (येथे साखर

म्हणजे आपण घरात वापरतो ती साखर ना घेता, glucose, fructose आणि maltose असा घ्यावा. या सर्वाना एकत्र मिळून मी येथे साखर हा शब्द वापरला आहे.)

मधमाशी जेव्हा मकरंद आणते तेव्हा ती मधमाशी पोळ्यात येऊन दुसऱ्या मधमाशीला तो देते, ती मधमाशी अजून एक तिसऱ्याच मधमाशीला तो देते..असे हे चक्र साधारण ८-१० मधमाश्या झाल्यावर थांबते. प्रत्येक मधमाशी या मकरंदामध्ये आपल्या तोंडातील वितंचक मिसळत असते. त्यामुळे मध लवकर तयार होतो.

जेव्हा हा मध साठवला जातो तेव्हा पोळ्यात असणाऱ्या मधमाश्या सारखे आपले छोटे पंख हलवून या मधला वारा घालत असतात, जेणेकरून त्यातील पाणी उडून जावे आणि साखरेचे प्रमाण जास्त असावे!

परंतु, सगळ्याच मकरंदाचा मधच होतो असे नाहीये. यातून थोडा भाग हा पोळ्यासाठी लागणारे मेण तयार करण्यासाठी वापरला जातो. मेणसुद्धा मधमाश्यांच्या शरीरात असणाऱ्या एका छोट्या घटकातून स्त्रवत असतो, जो या मकरंदाच्या संपर्कात आला कि मऊ होतो.

आता हे सर्व उपद्व्याप करण्याचे कारण म्हणजे हिवाळ्यात आणि ऐन उन्हाळ्यात फुलांची संख्या खूपच कमी असते. त्यामुळे साधारण ६-७ महिने या मधमाश्या अहोरात्र कष्ट करतात आणि नंतर ५-६ महिने मध खात आरामात दिवस काढतात.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

एक मच्छर  0.000005 litre रक्त पिऊ शकतो.

माणसाचे शरीरातील रक्त साधारण चार पाच लिटर असते.

ते संपवण्या साठी कमीत कमी दहा लाख मच्छर चावले पाहिजेत.

मादी जास्त जोरात चावते. कारण तिला अंडी देण्यासाठी जास्त प्रोटीन ची गरज असते. 

फोड आला की समजून जा मादी  जेवण करून गेलेली आहे.

नर जरा कमी चावतो. ते त्यांच्या वजनाच्या दुपट किव्हा तिप्पट रक्त पितात.

चार पाच तासाने त्यांना पून्हा भूक लागते.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

जिथे अगदी ३०० किलो वजनाचे दगड पण सुकलेल्या जमिनीवर आपणहून सरकतात आणि मागे लांबलचक माग सोडतात (कधी कधी तर चक्क अर्ध्या किलोमीटरहुन जास्त अंतराचा!). 

अगदी अलीकडील काळापर्यंत जगभरातील शास्त्रज्ञाना ह्या जागेचे कोडे उलगडत नव्हते. काही वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि थोड्याश्या नशिबाच्या साथीमुळे सरतेशेवटी शास्त्रज्ञ त्यात यशस्वी झाले.

अमेरिकेतील डेथ व्हॅलीमधील हवामान खूप शुष्क असते. ह्या भागामध्ये खूपच कमी पाऊस पडतो त्यामुळे येथील जमीन पण कोरडी असते. तसेच इथे प्रतिकूल हवामानामुळे सजीवांची संख्या पण खूप कमी आहे.

अश्या ह्या वाळवंटी भागामध्ये एक सुकलेले तळे आहे जे जेमतेम ४ किमी लांब आणि २ किमी रुंद भागामध्ये पसरलेले आहे. जगातील इतर तळी ही सामान्यतः उंचसखल असतात पण हे तळे पूर्णतः वेगळे म्हणजे सपाट / समतल आहे. तसेच पावसाचा अभाव असल्यामुळे हे तळे वर्षाचे बहुतेक दिवस सुकलेले असते.

ह्या जागेवर एक नैसर्गिक आश्चर्य अनुभवायला मिळते. अगदी लहान आकाराच्या दगडांपासून ते २००-३०० किलो वजनाचे दगड इथे सुकलेल्या वाळूमध्ये आपोआप सरकतात आणि मागे एक सरळ किंवा नागमोडी माग सोडतात.

सुरुवातीला लोकांचे असे मत झाले की एखादा माणूस किंवा प्राणी दगडांना वाळूमध्ये ढकलत असावा. पण दगडांचा माग सोडून इथे माणसाचे किंवा कोणत्याही प्राण्याच्या पायाचे ठसे कधीच आढळून आले नाहीत. त्यामुळे ही शक्यता नाकारण्यात आली आणि शास्त्रीय संशोधन सूरू करण्यात आले.

रेसट्रॅक प्लेया भागातील अनेक दगडांवर जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस (स्थाननिश्चिती करण्याची उपकरणे) लावण्यात आली. तसेच सभोवतालच्या भागामध्ये काही स्वयंचलित कॅमेरा बसवण्यात आले.

एवढा सगळा खटाटोप करून कित्येक दिवस शास्त्रज्ञांच्या हाती विशेष असे काहीच लागत नव्हते. ह्या जागेचे कोडे उलगडण्याची कोणतीही शक्यता दिसत नसताना अचानक त्यांचे नशीब पालटले.

एकाएकी पाऊस सुरू झाला. त्यामुळे गेले कित्येक दिवस पाण्याअभावी कोरडे पडलेल्या ह्या भागामध्ये पाणी जमा झाले. रात्रीच्या वेळी येथील तापमान गोठणबिंदूच्या जवळपास पोचते. त्यामुळे तळ्यातील पाण्यावर बर्फाचा थर जमा होऊ लागला. हा बर्फाचा थर जास्त जाड किंवा जास्त बारीक नव्हता.

गेले कित्येक दिवस ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते ती घडायला सुरुवात झाली. डिसेंबर २०१३ ते जानेवारी २०१४ ह्या काळामध्ये अनेक दिवशी दगड सरकत असतानाचे व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद करण्यात आले तसेच दगडांवर बसविलेल्या जीपीएस उपकरणांच्या साहाय्याने ते किती अंतर पार करून गेले ते पण नोंदविण्यात आले.

पुढे फेब्रुवारी २०१४ मध्ये तळे पूर्णपणे सुकले तेव्हा अपेक्षेप्रमाणे दगडांचे माग दिसू लागले. त्यावरून शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की,

जेव्हा जेव्हा रेसट्रॅक प्लेया भागामध्ये पाऊस पडतो आणि तळ्यामध्ये पाणी जमा होते तेव्हा एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली की दगड सरकू लागतात. पाण्यामध्ये अर्धवट बुडालेल्या दगडांवर बर्फाचे आवरण जमा होते आणि जेव्हा

मोठ्याने वारा वाहू लागतो तेव्हा पाण्याच्या पृष्ठभागावर जमा झालेले बर्फाचे थर सरकु लागतात.

त्याच्या बरोबर हे मोठमोठाले दगड पण सरकु लागतात. नंतर जेव्हा तळे आटते तेव्हा दगडांचे माग दिसू लागतात. इथे बर्फ महत्वाची भूमिका निभावतो.

अशा प्रकारे शास्त्रज्ञांनी एका नैसर्गिक आश्चर्याचा उलगडा केला.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

आपण जेव्हा जेवत असतो, तेव्हा अन्नासोबत थोडी हवा देखील आपल्या पोटामध्ये जात असते. 

आपल्या शरीरातील अन्ननलिका आणि पोटाच्या मध्ये एक लहानशी झडप असते. ही झडप आपण अन्न ग्रहण करीत असताना उघडते. अन्न पोटामध्ये गेल्यानंतर ही झडप आपोआप बंद होते.

अन्नासोबत थोडी हवा देखील त्या झडपेमध्ये शिरते. यालाच एरोफेजिया असे म्हणतात. जेव्हा आपण खूप घाई-घाईत जेवतो, तेव्हा अन्न व्यवस्थित न चावता घाईघाईने गिळतो. अश्या वेळी पोटामध्ये अन्नासोबत जास्त हवा शिरते.

जेव्हा पोटामध्ये प्रमाणापेक्षा अधिक हवा शिरते, तेव्हा ती हवा शरीराबाहेर टाकली जावी असा निर्देश मेंदूद्वारे पचनसंस्थेला दिला जातो.

तेव्हा पोटाच्या मासपेशी ताठरतात, आणि पोटावरील झडप काही काळाकरिता उघडते. त्या झडपेमधून पोटामधील साठलेली हवा घश्याच्या मार्गे, तोंडावाटे बाहेर टाकली जाते. यालाच आपण ढेकर म्हणतो.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

सर्वसाधारणपणे चॉकलेट, आईस्क्रीम, चिप्स, फ्रेंच फ्राईज, चायनीज नूडल्स, बेकरी उत्पादने केक, कुकीज, भेळ, पिझ्झा, बर्गर, फ्राइड चिकन, कोक व इतर सॉफ्ट ड्रिंक यांना आपण चविष्ट मानतो.

थोडं शास्त्रीय विवेचन केल्यास आपल्या लक्षात येईल, की हे सर्व पदार्थ प्रामुख्याने जास्त साखर वा मीठ असणारे आहेत. उदा. साधे शेंगदाणे जर खारे केले अथवा गूळ, साखरे बरोबर खाल्ले (चिक्की) तर आपण जास्त चवीने खातो! यामागे मानवी उत्क्रांती आहे. आज जसे रेडिमेड अन्न आपणास एका आदेशानुसार मिळते तसे ते पूर्वी मिळत नसे. साखर व मीठ हे कधी काळी मानवास अतिदुर्मिळ व अत्यावश्यक होते. 

त्यामुळेच आपले शरीर त्यांचा एकही रेणू वाया घालवत नाही. अति झाल्याने सध्या यांचे दुष्परिणाम होतात हा भाग निराळा.

तर आपला मेंदू या दोन घटकांसाठी विशेष प्रोग्रॅम आहे. यामुळेच मेंदू व पर्यायाने शरीर एक किक अनुभवतात. मानवी मेंदूसाठी इंधन म्हणून साखर हा एकमेव पर्याय आहे. इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवी मेंदू इतका जलद विकसित होण्यामागे साखर हे एक कारण आहे.

एक प्रकारची सवय अथवा व्यसन म्हणा! यात आता मोनोसोडीयम ग्लुटामेट सारख्या पदार्थांची भर पडली आहे. जे

मेंदूला फील गुड देतात, बक्षीसच समजा! सोप्या भाषेत केमिकल लोच्या!

चविष्ट पदार्थ बनविताना सर्व इंद्रियांना चेतना मिळावी असेच ते बनवितात व साहजिकच सर्वाना ते जास्त आवडतात.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

शरीराच्या नैसर्गिक प्रतिक्रियेचा हा एक नमुना आहे. जसे काटा पायात रुतला तर आपण स्स ss करतो; अचानक खाली पडताना हात पुढे घेतो, तिखट खाल्ल्यावर हा हा sss 

करतो, तसेच अति-आंबट खाल्ल्यावर नाकाजवळचे स्नायू अचानक आकुंचन पावतात आणि डोळे झाकले जातात.

ज्या दिशेच्या दाढेखाली तुम्ही हिरवी चिंच ठेवली आहे त्याबाजूचा डोळा अनैच्छिकपणे बंद होतो.

या सर्व शरीराच्या सुरक्षा यंत्रणा आहेत. चवीसाठी असलेले जिभेवरचे लव अर्थातच मेंदूला संदेश देतात आणि तीव्रताही कळवतात जेणेकरून उपाय योजला जावा.

कदाचित आम्लतेला सौम्य करणारे स्त्राव अशा स्नायूंच्या आखडण्यामुळे मोठ्या प्रमाणात तोंडात येतात आणि आंबटपणा कमी होतो.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*

जेवण केल्यानंतर अन्न जठरात जाते. पचनासाठी जठराकडे उर्जा जास्त वाहू लागते.

अशावेळी शरीराला खर्च होणारी उर्जा परत बाहेरून मिळवणे नैसर्गिक वाटते.

त्यामुळे थंडीचा संदेश त्वचेकडून पाठवला जातो जेणेकरून व्यक्ती थोडया उष्णतेकडे जाईल आणि उर्जा पूर्ववत होईल.

दुसरे कारण म्हणजे अशा उन्हात गेल्याने इतर लागणारे विटामिन मिळतात, शरीराची हालचाल झाल्याने पचन सुलभ होते.

पण त्यानंतर काही काळातच ही उर्जा शरीरात व्यवस्थापित करण्यासाठी स्थिरता आवश्यक होते. त्यामुळे झोप येते.

प्राणी पहा, दुपारचे खाऊन झाले की कसे उन्हात थोडावेळ झोप घेतात.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*