जेवणानंतर ढेकर का येतो?

आपण जेव्हा जेवत असतो, तेव्हा अन्नासोबत थोडी हवा देखील आपल्या पोटामध्ये जात असते. 

आपल्या शरीरातील अन्ननलिका आणि पोटाच्या मध्ये एक लहानशी झडप असते. ही झडप आपण अन्न ग्रहण करीत असताना उघडते. अन्न पोटामध्ये गेल्यानंतर ही झडप आपोआप बंद होते. 

अन्नासोबत थोडी हवा देखील त्या झडपेमध्ये शिरते. यालाच एरोफेजिया असे म्हणतात. जेव्हा आपण खूप घाई-घाईत जेवतो, तेव्हा अन्न व्यवस्थित न चावता घाईघाईने गिळतो. अश्या वेळी पोटामध्ये अन्नासोबत जास्त हवा शिरते. 

जेव्हा पोटामध्ये प्रमाणापेक्षा अधिक हवा शिरते, तेव्हा ती हवा शरीराबाहेर टाकली जावी असा निर्देश मेंदूद्वारे पचनसंस्थेला दिला जातो. 

तेव्हा पोटाच्या मासपेशी ताठरतात, आणि पोटावरील झडप काही काळाकरिता उघडते. त्या झडपेमधून पोटामधील साठलेली हवा घश्याच्या मार्गे, तोंडावाटे बाहेर टाकली जाते. यालाच आपण ढेकर म्हणतो.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*