लहान बाळ पापण्यांची उघडझाप का करत नाही ? बाळ आपल्याकडे टक लावून का पाहते?

बाळ टक लावून पाहतं तेव्हा आपल्याला त्यात विचित्र असं काही दिसत नाहीं,

पण तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलं तर एक गोष्ट दिसून येते. बाळ पापण्यांची उघडझाप न करता आपल्याकडे बघत आहे !!

हेच जर कोण्या मोठ्या माणसाने केलं तर आपल्याला ते विचित्र वाटू शकतं, पण लहान बळाने आपल्याकडे टक लावून पाहिल्यास आपल्याला ते छान वाटतं.

तुम्ही कधी विचार केलाय का लहान मुलं पापण्यांची उघडझाप का करत नाहीत ?

मग चला उत्तर समजून घेऊया.

मोठी माणसं एका मिनिटात साधारणपणे १० ते १५ वेळा पापण्यांची उघडझाप करतात, तर लहान मुलं एका मिनिटात केवळ २ वेळा पापण्यांची उघडझाप करतात. हे प्रमाण १४ वर्षानंतर वाढतं. आपण डोळ्यांची उघडझाप करतो याचं प्रमुख कारण आहे आपले डोळे हवेच्या संपर्कात येऊन कोरडे होतात.

हा कोरडेपणा रोखण्यासाठी आपल्याही नकळत डोळ्यांची उघडझाप होत असते.

लहानमुलांच्या डोळ्यांना अशा ओलाव्याची गरज नसते, कारण त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा झोपण्यात जात असतो.

डोळे उघडे राहणे आणि डोळ्यांची उघडझाप होणे यात काहीच संबंध आढळला नाही. नजर वळवतानाच बाळ डोळ्यांची उघडझाप करतं. म्हणजे डोळे कोरडे पडू नये म्हणून डोळ्यांची उघडझाप होते.

लहान मुलांसाठी त्यांच्या आजूबाजूचं जग नवीन असतं. ते सतत जागरूक असतात त्यामुळे त्यांच्या डोळ्यांची उघडझाप कमी होते.

लहान मुलांचा मेंदू जागरूक तर असतोच पण बरीच माहिती साठवत असतो. यात खंड पडू नये म्हणून पापण्यांची हालचाल कमीतकमी वेळा होते.

कारण बाळातले हेच गुण मोठ्यांमध्ये पण दिसतात.

आपण जेव्हा पूर्ण लक्ष देऊन एखादी गोष्ट करत असतो किंवा काहीतरी ऐकत असतो तेव्हा आपल्या पापण्यांच उघडझाप कमीतकमी वेळा होते.

सतत कम्प्युटरवर काम करणाऱ्यांमध्ये हे प्रमाण जास्त आढळून आलं आहे.

तर, याचा अर्थ लहान बाळाच्या उत्सुकतेमुळे त्याचे डोळे सतत उघडे असतात.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*