रेल्वेला गियर्स असतात का?

तर ह्याचे उत्तर आहे

रेल्वेला टिपिकल गाड्यांसारखे शिफ्टिंग गियर असणारे गियर बॉक्स नसतात.
रेल्वेला बेसिक दोन प्रकारचे गियर्स असतात.

हे गियर्स रेल्वेच्या चाकांच्या एक्सलला जोडलेले असतात.

हे दोन प्रकारचे गियर्स म्हणजे मेन गियर
आणि पिनियन गियर होय.

हे पिनियन गियर ट्रॅक्शन मोटरला जोडलेले असतात तर मेन गियर हे मुख्य चाकाला जोडलेले असतात.

इलेक्ट्रिक मोटर्सना गियरची आवश्यकता नसते कारण त्यांचा टॉर्क शक्तिशाली असतो किंवा कधी कधी इलेक्ट्रिक लोकोमोटरला एक सिंगल गियर दिलेला असतो. डिझेल वॅगन्सनाही गियर्स असतात.

काही डिझेल वॅगन्स मध्ये टॉर्क कन्व्हर्टर सह तीन ते चार गियर बॉक्स दिले असतात.

काही वॅगन्सना ट्रक सारखे मॅन्युअल क्लच आणि गियर बॉक्स दिलेले असतात. ट्रेन कंडक्टरजवळ क्लच पेडल व गियर लिव्हर असतात.

मालगाडीच्या इंजिनाला १:४:५ ह्या रेशीयोने गियर दिले असतात तर पॅसेंजर ट्रेनला इंजिनाला १:२:५ हा रेशीयो असतो.

परंतु रेल्वे इंजिनाला कार किंवा ट्रक सारखे ट्रान्समिशन गियर्स नसतात.

आताचे इंजिन हे डिझेल किंवा वीजेवर चालतात. डिझेल इंजिनामध्ये अल्टरनेटर दिलेले असतात

ज्यामुळे ट्रॅक्शन मोटर चालते.

अगदी बेसिक लोकोमोटिव्ह मध्ये सहा ट्रॅक्शन मोटर्स व एक अल्टरनेटर दिलेले असते.

लोको पायलट त्याच्या केबिन मध्ये असलेल्या लिव्हरने ट्रॅक्शन मोटर मधून पास होणारा करंट कमी जास्त करू शकतो. ह्याने रेल्वेचा वेग कमी जास्त होतो. करंट कमी जास्त करण्यासाठी अल्टरनेटरला फिल्ड कॉईल्स जोडलेल्या असतात.

छोट्या स्वयंचलीत वॅगन्स लहान मार्गांवर पॅसेंजर सुविधा देतात. ह्या वॅगन्सना लोकोमोटिव्ह म्हणजेच इंजिनची गरज नसते कारण ह्या वॅगन मध्येच डिझेल किंवा इलेक्ट्रिक इंजिन असते.

ह्या वॅगन्स मोठ्या ट्राम प्रमाणेच दिसतात व ह्यांना अश्याच आणखी तीन ते चार वॅगन्स जोडलेल्या असतात आणि त्याही रुळांवरच धावतात.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*