गणित व विज्ञान यांचे सौंदर्य, सामर्थ्य आणि या विषयातील आव्हाने स्विकारण्यातला आनंदानुभव अतुलनीयच असतो. या सर्वांची अनुभूति पाठ्यपुस्तके, परीक्षा आणि गुणांची टक्केवारी या चक्रात हरवलेल्या बहुसंख्य मुलांना सहसा मिळत नाही. पालक व शिक्षकांनी काही छोटे उपाय जाणीवपूर्वक केल्यास गणित – विज्ञान विषयाची व्याप्ती आणि मनोरंजकता मुलांना सहज समजू शकेल त्यासाठी गमतीदार रंजक गणित – विज्ञान खेळ, कोड़ी, गणित विज्ञानातील जादू – प्रयोग, गणित – विज्ञान तज्ञांच्या जीवनकथा या सर्वांचा योग्य टप्प्यावर वापर केल्यास सहजगत्या गणिताशी मैत्री जुळून येवू शकते.
माझी वेबसाइट याच प्रयत्नाचा एक भाग आहे. मी शासकीय – निमशासकीय व खाजगी शाळेतील इयता १ ली ते १० वि तील विधार्थांसाठी गणित – विज्ञानातील मुलभुत संकल्पना व क्षमता दृढ करण्यासाठी Mathematics Basic Foundation Course व Basic Concept of Science ( A Foundation Course) सुरु केला आहे.
WhatsApp us