पृथ्वीवरून सरळ चंद्रावर शिडी बांधून जाता येईल का?

शाळेतील मुलाचा प्रश्न आहे

एका शब्दात उत्तर: नाही..!

आपल्या मुलासाठी स्पष्टीकरण :

एव्हढी लांब शिडी तयार करणे आपल्याला सध्या तरी शक्य नाही.

आपल्यासाठी स्पष्टीकरण :

असा पदार्थ/धातू अजून आपल्याला ज्ञात नाहीये जो ४ लाख किमी.लांब असून, मधे कोणताही आधार न घेता स्वतःचे वजन सांभाळू शकेल.

समजा कोणी ४,०५,००० किमी. उंच अशी शिडी तयार केलीच आणि ती शिडी स्वतःचे वजन सांभाळू शकेल अश्या पदार्थाची/धातूची बनली तरी हे शक्य नाहीये.

चंद्राचे पृथ्वीभोवती फिरण्याचे अंतर ३,६०,००० किमी. ते ४,०५,००० किमी. पर्यंत बदलत असते. म्हणजे साधारण ४५,००० किमी. चा फरक या शिडीला कमी जास्त करता आला पाहिजे. त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान अजूनतरी (माझ्या माहितीत) विकसित झालेले नाही.

पण…

चंद्रापर्यंत नाही तर भूस्थिर कक्षेच्या पलीकडे एक उदवाहकलिफ्ट तयार करता येऊ शकेल.

साधारण ३६००० किमी. वर भूस्थिर कक्षा आहे. तिथे पर्यंत एक दोरी सोडायची जिची एक बाजू पृथ्वीवर बांधली असेल आणि दुसऱ्या बाजूला त्या दोरीच्या वजनाला भारनियमन (counter balance) करणारे वजन बांधले तर हे शक्य आहे.

या दोरीवरून Rope-Way प्रमाणे आपण ये-जा करू शकू. अवकाश उद्वाहक (Space Elevator) खालील चित्रांद्वारे स्पष्ट होईल.

भूस्थिर कक्षा म्हणजे उपग्रह किंवा या उत्तराच्या अनुषंगाने उद्वाहकाचा भारनियमक अश्या अंतरावर असेल तिथून तो पृथ्वीच्या परिवलन गतीएवढा वेग धारण करू शकेल. म्हणजेच तो आपल्याला पृथ्वीसापेक्ष पाहताना एकाच जागी आहे असे दिसेल. 

इतर आपण सोडलेले कृत्रिम उपग्रह आपली गती बदलताना दिसतात आणि ते पृथ्वीभोवती २४ तासात एक पेक्षा जास्ती फेऱ्या मारतात. भूस्थिर उपग्रह २४ तासात एकच फेरी पूर्ण करतो त्यामुळे तो आपल्याला अवकाशात स्थिर भासतो.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*