सापाला मरण नाही, कात टाकून साप तरूण बनतो असे म्हणतात. हे कितपत खरे आहे ?

साप हा सरपटणारा प्राणी आहे.

त्याची त्वचा सरपटन्यामुळे बोथट झालेली असते. त्यामुळे त्याचा वेग कमी होतो.

अशावेळी साप एखाद्या फटीतून ती त्याच्या शरीरापेक्षा लहान आहे अशा फटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच त्याच्या शरीरावर तयार झालेली बोथट त्वचा स्वतःपासून वेगळी करतो.
त्यामुळे त्याची जुनी त्वचा गळून पडते. आणि त्याला नवीन त्वचा मिळते.

याला कात टाकणे असे म्हणतात. कात टाकल्या बरोबर तो सळसळ करत नाही. तर थोडा वेळ मलूल झालेला असतो कारण जुनी त्वचा टाकताना त्याला बराच त्रास झालेला असतो.

नंतर मात्र तो वेगाने सरपटू लागतो.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*