ढग कशाचे बनलेले असतात ?

कधी कधी वातावरणात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते.

अशा क्षेत्रात आर्द्र हवा सर्व बाजूंनी प्रवेश करते आणि वर उचलली जाते.

आंतरिक प्रसरणाने ती खूपच थंड होते आणि त्यामुळे विस्तृत क्षेत्रावर जाड व मोठ्या ढगांची निर्मिती होते.

टेकडी किंवा डोंगर उतारावर पायथ्याकडील वारे टेकडी किंवा डोंगरामुळे वर उचलले जातात.

अशी  खूप आर्द्रतायुक्त हवा वर वर चढत जाते तेव्हा तिचे आंतरिक प्रसरण होते व त्यामुळे ती थंड होते.

त्या थंडाव्यामुळे हवेतील वाफेचे सांद्रीकरण होते आणि धुके निर्माण होते. धुक्याचेच ढग होतात.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*