आपले बोटे मोडतात म्हणजे नेमकं काय होते?

जवळपास सगळ्याच डायअर्थ्रोडील (Diarthrodial) जोड असलेल्या हाडांमध्ये ट्यांक असा आवाज येतो. हे जोड प्रामुख्याने हाताचे जोड असतात, पायाचे जोड असतात. परंतु काही डायअर्थ्रोडील जोड नसून सुद्धा त्यांच्यातून ट्यांक असा आवाज येतोच जसे की मान, पाठीचा कना, गुडघे, कंबरेचा भाग इत्यादी.

आपले हाडांचे जोड हे एका विशीष्ट द्रव्याने भरलेलं असते ज्याला Synovial Fluid, सिनोविअल द्रव्य म्हणतात. ह्या द्रव्याचे काम हाडांच्या जोडला पोषक तत्वे पुरवणे, घर्षण होऊ न देणे, एक लवचिकता बनवून ठेवणे हे असते. 

आता द्रव्य म्हटलं म्हणजे त्यात बऱ्याच अंशी पाणी असते आणि पाण्यात असतात बरेच वायु. सिनोविअल द्रव्यात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असते.

जेव्हा आपण ह्या जोडला ओढतो, विरुद्ध दिशेने खेचतो तेव्हा हे सिनोविअल द्रव्य प्रसरण पावते. खूप काळापासून सिनोविअल द्रव्य जसेच्या तसे राहिलेले असल्यामुळे जोड असलेल्या जागेत हवेचा दाब जास्त असतो त्यामुळे ते द्रव्य हाडांना घट्ट चिकटलेले असते. परंतु जेव्हा हाड वेगळी होतात, त्यांच्यातले अंतर वाढते तेव्हा ह्या द्रव्यात हवेचा दाब कमी होऊन बऱ्याच ठिकाणी पोकळी (Vaccum) तयार होते. पोकळी का तयार होते कारण की हाड लांब सरकतात पण द्रव्य तेवढच राहते म्हणून. ह्या पोकळी मी खाली दाखवल्या आहेत.

जेव्हा ह्या पोकळी तयार होतात तेव्हा सिनोविअल द्रव्यात विरघळलेले वायू जसे की कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजनचे बुडबुडे तयार होतात. अनेक बुडबुडे एकमेकांना मिळून मोठे बुडबुडे तयार होतात. जेव्हा ही लहान बुडबुडे एकमेकांना मिळतात तेव्हा ट्यांक असा आवाज तिथे होतो. काही मोठी बुडबुडे लगेच फुटतात तर काही बुडबुडे तशीच त्या द्रव्यात राहतात.

आपण जेव्हा जास्त दबाव असलेल्या सोड्याचा बाटलीला उघडतो तेव्हा त्याच्यात कसे बुडबुडे तयार होतात आणि टपटप आवाज येतो अगदी तसेच हे सुद्धा होते.

परत हाडे आपापल्या जागेवर आली असता काही बुडबुडे तशीच राहतात आणि हळूहळू हवेचा दाब त्यात स्थिर होत जातो. त्यामुळे हे वायूचे बुडबुडे परत त्या सिनोविअल द्रव्यात विरघळतात आणि सगळे पूर्वीसारखे होते. वायूचा दाब स्थिर व्हायला आणि ह्या पोकळ्या भरून काढायला कमीतकमी २० मिनिटे लागतात आणि म्हणून आपण दुसऱ्यांदा लगेच बोट

मोडली की आवाज येत नाही कारण द्रव्यात विरघळलेले वायूचे प्रमाण कमीच असते.

हे असे करणे चांगले असते का? 

नीट पाहिले असता ह्यामुळे काही नुकसान वैगरे होत नाही किंवा हाडांना इजा वैगरे होत नाही. काहीजण म्हणतात बोट मोडणे चांगले असते काही म्हणतात चांगले नसते परंतु दोघांसाठी काही ठोस पुरावे सापडलेले नाहीत.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*