शरीराच्या नैसर्गिक प्रतिक्रियेचा हा एक नमुना आहे. जसे काटा पायात रुतला तर आपण “स्स ss” करतो; अचानक खाली पडताना हात पुढे घेतो, तिखट खाल्ल्यावर “हा हा sss” करतो, तसेच अति-आंबट खाल्ल्यावर नाकाजवळचे स्नायू अचानक आकुंचन पावतात आणि डोळे झाकले जातात.
ज्या दिशेच्या दाढेखाली तुम्ही हिरवी चिंच ठेवली आहे त्याबाजूचा डोळा अनैच्छिकपणे बंद होतो.
या सर्व शरीराच्या सुरक्षा यंत्रणा आहेत. चवीसाठी असलेले जिभेवरचे लव अर्थातच मेंदूला संदेश देतात आणि तीव्रताही कळवतात जेणेकरून उपाय योजला जावा.
कदाचित आम्लतेला सौम्य करणारे स्त्राव अशा स्नायूंच्या आखडण्यामुळे मोठ्या प्रमाणात तोंडात येतात आणि आंबटपणा कमी होतो.
*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*