आपल्याला चविष्ट पदार्थच जास्त का आवडतात?
सर्वसाधारणपणे चॉकलेट, आईस्क्रीम, चिप्स, फ्रेंच फ्राईज, चायनीज नूडल्स, बेकरी उत्पादने केक, कुकीज, भेळ, पिझ्झा, बर्गर, फ्राइड चिकन, कोक व इतर सॉफ्ट ड्रिंक यांना आपण चविष्ट मानतो.
थोडं शास्त्रीय विवेचन केल्यास आपल्या लक्षात येईल, की हे सर्व पदार्थ प्रामुख्याने जास्त साखर वा मीठ असणारे आहेत. उदा. साधे शेंगदाणे जर खारे केले अथवा गूळ, साखरे बरोबर खाल्ले (चिक्की) तर आपण जास्त “चवीने” खातो! यामागे मानवी उत्क्रांती आहे. आज जसे रेडिमेड अन्न आपणास एका आदेशानुसार मिळते तसे ते पूर्वी मिळत नसे. साखर व मीठ हे कधी काळी मानवास अतिदुर्मिळ व अत्यावश्यक होते.
त्यामुळेच आपले शरीर त्यांचा एकही रेणू वाया घालवत नाही. अति झाल्याने सध्या यांचे दुष्परिणाम होतात हा भाग निराळा.
तर आपला मेंदू या दोन घटकांसाठी विशेष “प्रोग्रॅम” आहे. यामुळेच मेंदू व पर्यायाने शरीर एक “किक” अनुभवतात. मानवी मेंदूसाठी इंधन म्हणून साखर हा एकमेव पर्याय आहे. इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवी मेंदू इतका जलद विकसित होण्यामागे साखर हे एक कारण आहे.
एक प्रकारची सवय अथवा व्यसन म्हणा! यात आता “मोनोसोडीयम ग्लुटामेट” सारख्या पदार्थांची भर पडली आहे. जे मेंदूला “फील गुड” देतात, बक्षीसच समजा! सोप्या भाषेत “केमिकल लोच्या!”
चविष्ट पदार्थ बनविताना सर्व इंद्रियांना चेतना मिळावी असेच ते बनवितात व साहजिकच सर्वाना ते जास्त आवडतात.
*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*