पक्षी V आकारात का उडतात?
इंजिनीअरिंगमध्ये बायोमिमेटिक्स नावाचा शब्द अनेकदा वाचायला मिळतो. हा शब्द बायो आणि मिमिक्री अशा दोन शब्दांपासून बनला आहे. बायोमिमेटिक्स म्हणजे असे तंत्रज्ञान जे जिवंत वस्तुंची नक्कल करुन बनवण्यात आलेले असते. विमान हे बायोमिमेटिक्सचे सर्वात उत्तम उदाहरण आहे.
माणसाला उडता येत नाही, कारण माणसाच्या शरीराची रचनाच अशी असते की त्याला उडता येणार नाही. पण उडणारे पक्षी बघून माणसाने पक्षांच्या शरीरासारखेच विमान बनवले आणि त्यात बसून माणूस उडू लागला.
विमानांच्या कसरतीवेळी आपण बघितले असेल ती विमाने आकाशात V आकाराची रांग करुन उडत असतात, ही युक्ती सुद्धा पक्षांच्या थव्याकडूनच घेतली आहे. पण पक्षांचे थवे V आकारातच का उडतात.
सगळेच पक्षी V आकाराच्या थव्यात उडत नाहीत. काही स्थलांतर करणारे पक्षीच असे करतात. लांबीचे अंतर पार करणारे फिरस्ते पक्षीच V आकाराच्या थव्यांमध्ये उडतात. परंतु हे पक्षी असे का करतात ? का पक्षांचाही उडण्याचा स्वतःचा असा काही स्वॅग असतो? तर नाही!
आपण जहाज चालताना पाहिले असेल. जहाज जेव्हा पुढे जात असते तेव्हा त्याच्या अगदी पाठीमागचे पाणी खाली दाबले जाते आणि बाजूचे पाणी वर उसळते. पक्षी जेव्हा हवेत उडत असतात तेव्हा अगदी असाच सीन असतो.
पक्षी हवेत उडताना ते जसजसे पुढे जातात, तसतशी त्यांच्या पाठमागची हवा खाली दाबली जाते आणि बाजूची हवा वर जाते. ही बाजूची वर आलेली हवा दुसऱ्या पक्षांसाठी एकप्रकारे इंधनाचेच काम करते.
पक्षांना हवेत राहण्यासाठी ऊर्जा लागते. बाजूने वर येणारी हवा पक्षांना वर हवेत ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे पक्षांची ऊर्जा वाचते.
त्यामुळे एखादा पक्षी पुढे उडत असेल तर आपले इंधन म्हणजेच ऊर्जा वाचवण्यासाठी दुसरे पक्षी त्यांच्या बाजूने उडतात आणि थव्याला V आकार प्राप्त होतो. *ठराविक वेळेनंतर म्होरक्या बदलतात*
पक्षांच्या V आकारात हवेत उडण्याची संज्ञा वैज्ञानिक भाषेत बर्बल म्हणून ओळखली जाते. V आकारात उडणाऱ्या पक्षांच्या थव्यात पुढच्या टोकाला जो पक्षी असतो त्याला इतर पक्षांच्या तुलनेत जास्त मेहनत करावी लागते.
म्होरक्याला बर्बलचा नाही. म्हणूनच पक्षी एकमेकांच्या समजूतदारीने ठराविक वेळेनंतर आपला म्होरक्या बदलून एका कुणावर जास्त भर पडून देत नाहीत आणि सर्वांना सामान संधी दिली जाते.