खेडोपाडी सर्व लोकांमधे थोड्याफार प्रमाणात ही पद्धत आज ही अस्तित्वात आहे.
दुसरी गोष्ट, ताट किंवा पाना भोवती पाण्याचं वर्तुळ काढून कीडा, मुंग्या, माकोडे रोखता येतात हे बरोबर आहे,
परंतू आपण जर असं करणाऱ्याचं निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल की,
जेवणाच्या भोवती वर्तुळ काढून झाल्या नंतर लोकं उर्वरीत पाणी प्राशन करून नंतर ताटा ला श्रद्धा पूर्वक वंदन करून नंतर च जेवणाला सुरूवात करतात.
या कृत्या चा अर्थ असा कि अन्न हे पुर्न ब्रह्म आहे व ते देणाऱ्या परमेश्वराचे आभार मानुन मी ते आदर पुर्वक ग्रहण करत आहे.
कृपया अन्न वाया घालवू नका. हा संदेश या कृत्या मागे आहे.
कृपया आपन सर्वांनी अन्न वाया जाणार नाही याचं पालन करावं ही हात जोडून विनंती.
*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*