www.pankajmattemathscienceteacher.com ही वेबसाईट आपणास सादर करतांना अत्यंत आनंद होत आहे की, मी मागील 18 वर्षापासून गणित व विज्ञान इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवीत आहे.
गणित व विज्ञान हे विषय अध्यापनाचा अनुभव गाठीशी असला तरी प्राथमिक ते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान शिकविण्यासाठी व त्यात गोडी निर्माण करण्यासाठी मनोरंजक, आकर्षण निर्माण करणार्या पद्धती वापराव्या लागतात याची प्रथम जाणिव मला माझी मुलगी सृष्टी हिला शिकवतांना झाली. सृष्टीचे न संपणारे प्रश्न, नवीन शिकण्याचा उदंड उत्साह आणि गोष्टींचे वेड, सृष्टीची ही आवड पूर्ण करण्यासाठी ONLINE गणिती खेळ, गणित- विज्ञान तज्ञांच्या गोष्टी, विज्ञानातील प्रयोग यांचा शोध सुरू झाला आणि ONLINE मिळविलेल्या माहितीवर गरजेनुसार संस्करण करणे सुरु झाले. हे सगळे करणे शिक्षक म्हणून माझ्यासाठी आनंददायी होते.
विद्यार्थी स्वतः स्वयंपूर्ण बनला पाहिजे. विद्यार्थ्याला स्वतः चा अभ्यास स्वतः करता आला पाहिजे.
यासाठी मी माझ्या वेबसाईट च्या माध्यमातून गणित आणि विज्ञान दोन्ही विषयाच्या मूलभूत संकल्पना व क्षमता दृढ होण्याच्या दृष्टीने BASIC FOUNDATION COURSE तयार केला आहे, सोबतच इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी ONLINE TEXTBOOK SOLUTIONS, तसेच इयत्ता दहावी साठी विज्ञान विषयाची ONLINE QUIZE तयार केली आहे. त्याचप्रमाणे संबंधित विषयाचे STUDY MATERIAL देण्याचा प्रयत्न आहे.
NOW NO TENSION OF TEXTBOOKS. STUDY WITH ENTHUSIASM.
WATCH MY WEBSITE AND MAKE YOURSELF FREE FROM A LOAD OF TEXTBOOKS.
विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षकाची आवश्यकता नाही, त्यांना अशा एका शिक्षकाची आवश्यकता आहे, जो त्यांना शिकण्यास उत्साहित करतो, असा शिक्षक जो हसतो आणि त्यांना शाळेत आल्यावर आनंद देतो प्रत्येक दिवस.
STUDENTS DON’T NEED A PERFECT TEACHER, THEY NEED A TEACHER WHO GETS THEM EXCITED ABOUT LEARNING. A TEACHER WHO SMILES AND MAKES THEM ENJOY COMING TO SCHOOL EACH AND EVERY DAY.
शालेय शिक्षणात गणित – विज्ञानाला महत्वाचे स्थान आहे. शालेय स्तरावर इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत दोन्ही विषय अनिवार्य आहे. याच शालेय जीवनात गणित-विज्ञाना ची गोडी विकसित झाली तर गणित व विज्ञान हे विषय आयुष्यभर आवडीचे विषय बनतील. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये गणित-विज्ञाना ची गोडी वाढविण्यासाठी मी माझ्या शाळेत MATHEMATICS DEARS AND SCIENCE DEARS (गणित मित्र व विज्ञान मित्र ) या संकल्पनेची सुरवात केली आहे. यापुढे आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा मानस आहे.
www.pankajmattemathscienceteacher.com या वेबसाईट च्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये गणित-विज्ञाना ची गोडी निर्माण होईलच तसेच प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या स्तरावर स्वतः च घरच्या घरी, कोठेही, केव्हाही मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप कॉम्प्युटर च्या माध्यमातून गणित-विज्ञाना चा मनापासून अभ्यास करू शकतील.
चला तर मग गणित-विज्ञान सोपे करूया…….
आपण सर्व मिळून, गणित-विज्ञान अवघड वाटणाऱ्यांना गणित, विज्ञानाचा मार्ग सुलभ करून देऊया……
गणित-विज्ञान मित्र
पंकज वामनराव मत्ते
जनता विद्यालय
सिटी ब्रँच बल्लारपूर जि. चंद्रपूर
मोबाईल नंबर 9921312562