शिंक आल्यावर आपण डोळे का बंद करतो?
आपण श्वास घेतो तो ऑक्सिजन असतो अस आपल्याला वाटत. परंतु आपण श्वास घेतो ती हवा असते आणि हवेत ऑक्सिजनचे प्रमाण फक्त २०.९% एवढेच असते.
आता जी हवा आत घेतली जातेय ती नक्कीच आपल्या श्वासनलिकेतून पुढे जाते. ह्या हवेमध्ये धुळीचे कण असतात, प्राण्यांचे केस असतात, परागकण असतात.
नाकाच्या वरच्या भागात आणि दोन्ही भुवयांच्या थोडं खाली नसल म्युकोसा (Nasal Mucosa) असतो जो हवेत काहीतरी नको असलेलं आलं आहे त्याची खात्री करतो आणि आपल्या मेंदूच्या Medulla भागाला संदेश देतो की शिंक जोरात.
सर्दीच्या वेळेस आपले नसल म्युकोसा सामान्यतेपेक्षा २०% अधिक संवेदनशील झालेले असते म्हणून सर्दी असतांना थोडं काही झालं की शिंका येतात.
शिंकताना पूर्ण शरीर आकुंचन पावत, मोठा श्वास घेतला जातो आणि जोरात “आ!!!!क्चु” म्हणून आत घेतलेली हवा तोंडावाटे आणि नाकावाटे बाहेर फेकली जाते आणि परत नसल म्युकोसा पडताळून पाहतो की जे होत ते गेल की नाही.
एका शिंकेमध्ये जवळपास ५००० नको असलेले कण नाकावाटे आणि तोंडावाटे बाहेर फेकले जातात.
शिंकण्याची गती अतिशय जास्त असते. नाकातून, तोंडातून हवा तब्बल १६० किलोमीटर प्रती तास इतक्या वेगाने बाहेर फेकली जाते.नाकातली हवा जवळपास १५० सेंटीमीटर लांब फेकली जाते.
पण मग डोळे का बंद होतात?
ह्यामागचे खरे कारण अजूनही समजू शकले नाहीय. शिंकणे ही क्रिया आकस्मिक (Involuntary) म्हणजेच जिच्यावर आपला फारसा कंट्रोल नसतो अशी आहे.
शिंकताना छाती फुलते, डोळे बंद होतात आणि जेव्हा शिंक निघते तेव्हा डोकं पुढे ढकलले जाते. डोक आपल्या नाकाला एक धक्का (Jerk) मिळावा जेणेकरून हवेची गती वाढावी म्हणून जोरात पुढे जाते.
एक कारण असेही की जे नको असलेले कण बाहेर आले आहेत ते डोळ्यांमध्ये जाऊ नये. शिवाय डोक जेव्हा पुढे जात तेव्हा डोळ्यांवर अतिरिक्त ताण पडू नये म्हणून डोळे बंद होतात कारण डोळे नाजूक असतात.
परंतु डोळे उघडे असतांना शिंकणे शक्य आहे, त्यामुळे ते बाहेर येतात असं नव्हे.
*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*