जगात असा कोणता देश आहे जिथे रात्र होत नाही आणि का?

जगात असा कुठलाच देश नाही, जिथे कधीच रात्र होत नाही! परंतु, यास काही ठिकाणे काहीअंशी अपवाद आहेत. जिथे
सलग दोन-तीन महिने रात्र होत नाही!

कॅनडा : या देशात उन्हाळ्यात तब्बल 50 दिवस सलग
दिवस असतो!

नॉर्वे : या देशात मे ते जुलै असे तीन महिने सर्वत्र उजेडच असतो!

आईसलँड : या युरोपातील बेटसदृश देशात तब्बल तीन महिने रात्र होत
नाही!

फिनलँड : इथे उन्हाळ्यात तब्बल 78 दिवस सलग सूर्यप्रकाश असतो!

अलास्का : या ठिकाणी मे ते जुलै असे तीन महिने रात्र होत नाही!

ही प्रमुख ठिकाणे झालीत.
शिवाय अन्य काही ठिकाणे या यादीत मोडतात. 

सूर्य जेव्हा ध्रुव अवस्थेत क्षिताजाच्या खाली राहतो, तेव्हा अशी स्थिती निर्माण होते. अशा घटनेला पोलर नाईट म्हणून ओळखले जाते.

आणि यासाठी पृथ्वीचे स्वत:भोवती फिरणे कारणीभूत ठरते. कारण, पृथ्वी आपल्या अक्षावर (आसावर) 23.5 अंश झुकलेली आहेत. 

पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे सूर्याभोवती फिरत असते. मात्र, ती स्वत:भोवती फिरत असताना संबंधित भाग अधिक काळ सूर्यासमोर असतो. परिणामी त्या ठिकाणी रात्र होत नाही! 

परंतु, ही स्थिती काही काळच असते. अन्य वेळी तिथे सर्वसामान्य स्थिती असते.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*