इस्त्राईल च्या मृत समुद्रात माणूस का बुडत नाही?
*समुद्रात किंवा नदीमध्ये अंघोळ करत असताना आपण पाण्यात बुडायची भीती मनाच्या एका कोपऱ्यात घर करून असते. पण मृत समुद्र हा असा एक समुद्र आहे ज्यामध्ये कोणी ठरवून देखील बुडू शकत नाही.
आश्चर्य वाटलं ना? पण हे खरंय !*
मृत समुद्र हा जगातील सर्वांत छोटा आणि कमी क्षेत्रफळावर पसरलेला समुद्र आहे. हा इझ्राएल-जॉर्डन या देशांच्या दरम्यानचा एक नैसर्गिक जलाशय आहे. ‘समुद्र’ या अपसंज्ञेने तो ओळखला जातो.*
त्याचा नैर्ऋत्य भाग इझ्राएलमध्ये व इतर भाग जॉर्डनमध्ये मोडतो. हा समुद्र ६५ किलोमीटर लांब आणि ८ किलोमीटर रुंद आहे. हा समुद्र १३७५ फूट खोल आहे. मृत समुद्राला पृथ्वीचा सर्वांत खालचा बिंदू मानले जाते. मृत समुद्राला मुख्यत्वे जॉर्डन नदी आणि इतर छोट्या नद्या येऊन मिळतात. हा जगातील सर्वाधिक क्षारता असलेला (साधारण इतर सागरजलापेक्षा ७ ते १० पटींनी अधिक क्षारता) समुद्र आहे.*
भूरचनादृष्ट्या हा समुद्र जॉर्डनच्या भल्या मोठ्या खचदरीचा भाग आहे.*
शास्रज्ञांच्या मते तृतीयक कालखंडातील पृथ्वीच्या हालचालींमुळे या समुद्राची निर्मिती झाली असावी, हे याच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंस असलेल्या डोंगररांगांच्या तीव्र कड्यांच्या अभ्यासावरून दिसून येते.
तसं पाहिलं तर प्रत्येक समुद्राचं पाणी खारटच असतं, पण मृत समुद्राचे पाणी इतर समुद्राच्या तुलनेत ३३% अधिक खारट आहे. हा कारणामुळेच या पाण्यात जलचारांचे अस्तित्व देखील आढळत नाही.यात मासे किंवा अन्य जलजीव जिवंत राहू शकत नाहीत.
पण हे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या पाण्याने अंघोळ केली असता कित्ये ग नष्ट होतात. लवण, पोटॅश व ब्रोमीन एवढीच या समुद्रातून मिळणारी उत्पादने होत. सामान्य पाण्याच्या तुलनेत मृत समुद्राच्या पाण्यात २० पट जास्त ब्रोमीन, ५० पट जास्त मैग्निशियम, आणि १० पटीने अधिक लवण म्हणजेच आयोडीन असते.
यातील ब्रोमीन धमन्यांना शांत करते, मॅग्नेशियम त्वचेची ऍलर्जी दूर करते आणि आयोडीन कित्येक ग्रंथींची क्रियाशीलता वाढविण्याचे काम करते.
सडोम व गमॉर ही प्राचीन शहरे याच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावर होती. विद्यमान सडोम येथे मीठ उत्पादन केले जाते. या समुद्रात मीठाचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे मृतसागरातील पाण्याचे घनत्व अधिक आहे. त्यामुळे या समुद्रात कोणीही बुडत नाही.
ही गोष्ट इथे येणारे पर्यटक खूप एन्जॉय करतात. या ठिकाणी पाण्यात राहून तुम्ही अनेक गोष्टी करू शकता, जसे की, वर्तमानपत्र वाचणे, मासिके वाचणे, चहा- कॉफी किंवा ज्युसचा आस्वाद घेणे.
या वैशिष्ट्यांमुळे इथले पर्यटन विकसित झाले आहे. हा प्रसिद्ध पिकनिक स्पॉट बनला आहे. समुद्रकिनारी हॉटेल्स बांधली गेली आहेत.
या सागराचे पाणी खूप गुणकारी आहे. याच्या उपयुक्ततेच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. असं म्हणतात की क्लिओपात्रा देखील या समुद्रातील पाण्याचा वापर आपले सौंदर्य वाढविण्यासाठी करत असे.
मात्र आता हळूहळू या सागराचे पाणी कमी होऊ लागले आहे. या समुद्राला मिळणाऱ्या जलाशयांनी आपला पाण्याचा रस्ता बदलला आहे. याशिवाय मिनरल इंडस्ट्री सुद्धा यातील पाण्याचा बऱ्याच प्रमाणात वापर करत आहे. शिवाय या पाण्याचा वापर करून कॉस्मेटिक इंडस्ट्रीज सौंदर्यप्रसाधने निर्माण करत आहेत.
हे असेच चालू राहिले तर या समुद्रातील पाणी वारंवार उपसले जाऊन एक दिवस या सागराचे अस्तित्वच संपेल.
*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*