घोड्याच्या पायाला बोटे का नसतात?
घोडा हा इतिहासातला महत्वाचा प्राणी.
आपल्यातल्या बऱ्याच जणांनी घोड्यावर रपेट मारली असेल, घोड्याची नाल दारावर लावली असेल, पण तुम्ही कधी घोड्याच्या पायांकडे बघितलं आहे का ? तिथे बोटे का नसतात ?
एकच एक मोठं अर्धगोल बोट आपल्याला दिसतं. तसं पाहायला गेलं तर ही खूपच साधी गोष्ट आहे, पण तितकीच महत्वाची आहे. चला तर आज जाणून घेऊया घोड्याची बोटे गेली तरी कुठे?
घोड्याच्या शरीराचा आकार वाढला तसतसा त्याच्या ३ बोटांमध्ये बदल होत गेला. सगळा भार हा मधल्या बोटावर आला.
या कारणाने मधल्या बोटाचा आकार वाढला. पुढे जाऊन अशी परिस्थिती निर्माण झाली की बाजूची २ बोटे अडथळा निर्माण करू लागली.
तर, बोटं नाहीशी होण्याचं हे एक कारण झालं. दुसरं कारण थोडं वेगळं आहे. कुत्रा किंवा मांजरीचा पायाचा तळवा बघितला तर आपल्याला मऊ भाग दिसतो, पण हा भाग घोड्याच्या पायांना नसतो. घोड्याला दुडक्या चालीने धावण्यासाठी हा मऊ भाग नाहीसा झालेला आहे. आणि बोटे नाहीशी झाल्याशिवाय हा भाग नष्ट होणे शक्यच नव्हतं.
उत्क्रांतीत घोड्याची पुढची बोटे नाहीशी झाली असली तरी मागच्या बाजूला अजूनही बोटे असल्याच्या खुणा दिसतात. हा भाग केसांनी वेढलेला असतो.
अजूनही उत्क्रांती थांबलेली नाही. विज्ञानाच्या मते काही दिवसात मागची बोटे पण नाहीशी होऊ शकतात.
एकंदरीत घोड्याची ओळख असलेला त्याचा वेग उत्क्रांत होण्याची ही प्रक्रिया आहे.
*काय मग? कसं वाटलं हे गुपित ?